पातूर(सुनिल गाडगे) : पातूर येथे राज्याचे महसूल मंत्री तथा वाशिम जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.श्री. संजय भाऊ राठोड यांनी आपल्या बंजारा समाजाच्या काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी जगतगुरु संत सेवलाल महाजांच्या नंगारा (वाद्य) आकाराच्या 25 कोटी रुपयाच्या 3 मजली इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला समाज बांधवांनी 3 डिसेंबर रोजी उपस्थित राहावे अशी विनंती केली . तसेच समाजाच्या विविध समस्या संदर्भात सर्व पक्ष व संघटनांनी एकत्रित येऊन समाजाची एकजूट शासन व प्रशासनाला दाखवावी असे आवाहन महसूल राज्य मंत्री यांनी केले. तसेच कार्यक्रमाला ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक ,वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव , तसेच पातूर पंचायत समितीचे माजी सभापती कालू सिंह राठोड ,कमल सिंह राठोड आदी उपस्थित होते.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी रवी मूर्तडकर(तालुका अध्यक्ष),अजुभाऊ ढोणे(शहर अध्यक्ष)महिला संघटिका हर्षा ताई देवकर ,उपसहर प्रमुख रामा शेंगोकार,शंकर देशमुख,राहुल शेंगोकार सह पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन बंटी भाऊ जाधव (बंजारा समाज समनव्यक ,संघटक अकोला) यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंजारा साहित्यिक डॉ. शांतीलाल चव्हाण यांनी केले व आभार डॉ. अनिल जाधव यांनी मानले.तसेच परिसरातील बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola