अकोला (प्रतिनिधी) : सन २०१७-१८ अंतर्गत प्राप्त नगरोत्थान, दलितेतर व दलित वस्ती निधी अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे तातडीने करण्यात यावेत. या कामांकरिता मिळालेला निधी परत गेल्यास संबंधीतावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर विजय अग्रवाल यांनी दिला.
नगरोत्थान, दलितेतर व दलित वस्ती निधी अंतर्गत सुरु असलेल्या कामाची निविदा तसेच प्रगती पथावरील कामांचा गुरुवारी (ता. १५) महापौर विजय अग्रवाल यांनी आढावा घेतला. मनपाच्या स्थायी समिती सभागृह येथे आयोजित बैठकीमध्ये शहर अभियंता सुरेश हुंगे, नगरसेवक अमोल गोगे, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, उपअभियंता श्री. टापरे, श्री. गोंडाणे, श्री. शिरसाट यांच्यासह जलप्रदाय विभाग, बांधकाम व विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी सन २०१८-१९ अंतर्गत नगरोत्थान व दलितेत्तर निधीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता सादर करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सन 2018-19 प्राप्त दलित वस्तीची कामे संबंधीत नगरसेवकांकडून घेउन यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना दिले. शासनाने एल.ई.डी. पथदिव्यांच्या संदर्भात ई.ई.एस.एस.कंपनीशी करार केल्यामुळे एल.ई.डी. पथदिव्यांची कामे दलित वस्ती निधी अंतर्गत घेउ नये असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.
हद्दवाढी भागामध्ये महाराष्ट्र शासनाकडून अकोला महानगरपालिकेला 96.30 कोटींची कामांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हद्दवाढी भागातील कामांची निविदा सुध्दा तातडीने काढण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. सदर निविदा २१ नोव्हेंबरपर्यंत प्रकाशित करण्यात यावी असेही त्यांनी निर्देशित केले. हद्दवाढी भागातील कामांचे वर्गीकरण ज्यामध्ये बांधकाम विषयक, विद्युत व पाणी पुरवठा विषयक कामे अशा प्रभागनिहाय वेगवेगळ्या कामांची एकत्रित कामांची निविदा काढण्यात यावी अशा सुचना महापौर विजय अग्रवाल यांनी केल्या.
जलप्रदाय विभागामार्फत जलकुंभनिहाय असलेल्या लिकेज दुरुस्तींच्या कामांचीसुध्दा तपासणी करणे व लिकेजचे कामे तातडीने करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देशित केले. संबंधीत अभियंता सूचना केल्यावरच कार्यवाही करत असल्याची तक्रार असल्याने तसे होता कामा नये. तसेच रस्त्यावर पाणी येऊन पाण्याचा अपव्यव होउन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश उपमहापौर वैशाली शेळके यांनी दिले.
कंत्राटदारांची असलेली प्रलंबित देयके त्यांनी कामे केलेली असल्यामुळे अदा करण्यात यावी असे निर्देश महापौरांनी दिले. ज्या कामांचे विविध निधी अंतर्गत कामाचे आदेश होउन कामे बंद आहेत अशा कामांचा झोननिहाय तक्ता तयार करुन कामांचे नियोजन करुन कामे तातडीने पुर्ण करण्याचेही महापौर विजय अग्रवाल यांनी निर्देशित केले. कोणत्याही कामांना विलंब होउ नये तसेच संपूर्ण कामांची जबाबदारी निश्चित करुन कामे प्रलंबित झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. जलप्रदाय विभाग, बांधकाम विभागांतर्गत प्रकाशित झालेल्या निविदांसंदर्भात कामांचे आदेश तातडीने देण्याबाबत सूचना महापौर विजय अग्रवाल यांनी केल्या.
अधिक वाचा : अग्रक्रमाच्या योजना ‘मिशन मोड’वर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola