अकोट (शब्बीर खान) : अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांच्या वकिलांशी असहयोग व उद्धटपणाच्या वागणुकीला कंटाळून दि.१ सप्टेंबर २०१८ पासून आकोट वकील संघाने बहिष्कार टाकला होता.घुगे यांचेवर कारवाईसाठी विभागीय महसूल आयुक्त व जिल्हाधिकारी अकोला यांना ठरावाची प्रत व निवेदन सादर केले होते. गेल्या अडीच महिन्यांपासून वकिलांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची न्यायालयीन कामे अडून पडली होती.यावर कोणताच तोडगा न निघाल्याने वकिलांसह सर्व त्रस्त झाले होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी लोणकर यांचेकडे वकिलांचे बहिष्कार प्रकरण चौकशीसाठी सोपविण्यात आले होते.आज ते अकोटला आले असता प्रकरणाच्या चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात वकिलसंघाचे सदस्य,सचिव व तहसीलदार यांना बोलावून दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले यावेळी तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नसल्याचे सांगून वकील वर्गाला कामकाजात पूर्ण सहकार्य करून सन्मानाची वागणूक देण्यात येईल असे सांगितले.यावर आकोट वकील संघाच्या सदस्यांनी पक्षकारांचे हितासाठी प्रकरण आणखी ताणून न धरता गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेला बहिष्कार मागे घेतला. येत्या सोमवार पासून आठवड्यातून दोन दिवस तहसीलदार यांच्या कार्यालयातील न्यायालयीन प्रकरणांत कामकाज नियमित सुरू करण्यात येणार असल्याचे वकील संघाचे सचिव सुशील खवले यांनी सांगितले.
अधिक वाचा : मुख्यमंत्री यांच्याकडून अकोट तालुक्यातील पुर्नवसित गावांना अनोखी भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola