अकोला : विदर्भ कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी श्री राजुभाऊ पिसे वर्धा व बाबाराव आगलावे चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे नुकतीच जिल्हा कबड्डी महासंघाची बैठक सम्पन्न झाली. गाव तेथे कबड्डी मंडळ स्थापन करणे व जिल्ह्यातील प्रामाणिक खेळाडूंना न्याय मिळवून देन्याच्या उद्देशाने क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये कबड्डी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी म न पा नगरसेवक मंगेशभाऊ काळे, कार्याध्यक्ष पदी माजी राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच आंबदास नागे, उपाध्यक्ष पदी राष्ट्रीय खेळाडू व माजी जि प सदस्य हरिभाऊ भाळतीलक तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय पंच प्रभाकर रुमाले, सचिवपदी विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजक राजू दहापुते, सहसचिव पदी राष्ट्रीय पंच व शा शी संघटनेचे जिल्हा सचिव संजय मैंद, कोषाध्यक्ष माजी खेळाडू अमोल चिलात्रे, प्रसिद्धि प्रमुख आदर्श शिक्षक गजानन डोईफोडे, जिल्हा पंच प्रमुख म्हणून प्रा साहेबराव वानखडे व सदस्य म्हणून मंगलसिंह ठाकूर यांनी निवड करण्यात आली.
तसेच अकोला महानगर अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ञा डॉअमोल रावणकर अकोला ग्रामीण ता अध्यक्ष पदी माजी म न पा सभापती शिवाभाऊ मोहोड, मूर्तिजापूर ता अध्यक्ष पदी भा ज पा तालुका उपाध्यक्ष बबलू उर्फ धनंजय ढोक, बार्शीटाकली ता अध्यक्ष पदी माजी प स सभापती गजानन भाऊ म्हैसने, बाळापूर ता अध्यक्ष पदी शिवसंग्राम चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप दादा पाटील, पातूर ता अध्यक्ष पदी राष्ट्रीय खेळाडू रमेश जाधव, तेल्हारा ता अध्यक्ष पदी ऍड अरुण कुकडे, अकोट ता अध्यक्ष पदी रामकृष्ण टेकाम यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.
अकोला जिल्ह्यात कोणत्याही आयोजकास व मंडळास विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्यावयाच्या असल्यास विदर्भ कबड्डी संघटनेचे सचिव आ सुभाषभाऊ पिसे यांचेशी सम्पर्क साधावा असे आवाहन कबड्डी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा मंगेश काळे यांनी केले आहे.
अधिक वाचा : बोडखा ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण ; उपोषणाला आजपासून सुरवात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola