अकोला (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जोरात सुरू असतानादेखिल अनेक ठिकाणी नव्याने अतिक्रमण होत असल्याची बाब लक्षात आल्याने महापौर विजय अग्रवाल यांनी स्वत: अचानक शहराचा फेरफटका मारला आणि अतिक्रमणांची पाहणी केली. अतिक्रमण काढल्यानंतरही पुन्हा अतिक्रमण होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तातडीने अधिकाऱ्ळांची बैठक घेऊन शहर अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडविण्याचे निर्देश दिले.
महापौर श्री विजय अग्रवाल यांनी स्वतः अचानक कोणी ही अधिकारी सोबत न घेता गांधी चौक आणि परिसराची पाहणी केली. किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या गाड्या परत दिसून आल्या. त्या संदर्भात महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. शहर अतिक्रमणधारकांच्या विळख्यातून सोडविण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने मोहीम अधिक तीव्र केली. मंगळवारी (ता. १३) अतिक्रमण पथकाने सिटी कोतवाली ते बस स्टँड, म.न.पा. समोरील चौपाटी, फतेह चौक, बस स्टँड आणि पेट्रोल पंप मधील रस्ता, अशोक वाटिका ते सामान्य रुग्णालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरील अतिक्रमण काढले. मंगळवारी अतिक्रमण पथकाने कोणाचीच गय केली नाही. हे पथक शहरात दोन ते तीन वेळा फिरले. ज्या लोकांनी परत गाड्या लावल्या त्यांच्या गाड्यांना तोडण्यात आले.
अतिक्रमण विभागाची ही कारवाई बऱ्याच उशिरापर्यंत सुरू होती.
अधिक वाचा : अकोला शहरातील अतिक्रमणावर हातोडा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola