दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहलीनं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. गोलंदाजीमध्येही भारताचा दबदबा कायम असून जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या यादीत कोहली हा ८९९ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा ८७१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवननं ७६७ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. मागील काही सामन्यातील दमदार कामगिरीमुळं शिखरनं नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी २०व्या स्थानी आहे.
सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह ८४१ गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनाही पहिल्या दहामध्ये स्थान मिळालं आहे. कुलदीपनं तिसरा क्रमांक कायम राखला असून चहलनं आठवरून थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, सर्वोत्तम संघांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानावर इंग्लंडचा संघ आहे.
अधिक वाचा : राेहितचे विक्रमी शतक; भारताची विंडीजवर मात, मालिकेत आघाडी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola