लखनऊ – जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार राेहित शर्माच्या (नाबाद १११) धडाकेबाज विक्रमी शतकाच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी मालिका विजयाची नाेंद केली. भारताने मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजवर ७१ धावांनी मात केली. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेतली. अाता मालिकेतील तिसरा सामना रविवारी हाेणार अाहे.
घरच्या मैदानावर जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारताचा ३४ दिवसांत (४ अाॅक्टाेबर ते ६ नाेव्हेंबर) विंडीजविरुद्धचा हा सलग तिसरा मालिका विजय ठरला. यात क्रिकेटच्या कसाेटी, वनडे अाणि टी-२० या तिन्ही फाॅरमॅटचा समावेश अाहे. तसेच भारताचा टी-२० मधील हा सलग सातवा मालिका विजय ठरला अाहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विंडीजला अवघ्या १२४ धावांवर राेखले.
राेहितचे विक्रमी शतक : राेहितने विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यादरम्यान नव्या मैदानावर विक्रमाला गवसणी घातली. त्याने अापल्या टी-२० च्या करिअरमधील चाैथे शतक साजरे केले. यासह ताे यामध्ये शतकांचे चाैकार ठाेकणारा जगातील पहिला फलंदाज व कर्णधार ठरला. यापूर्वी ताे न्यूझीलंडच्या काेलिनसाेबत (३ शतक) संयुक्तपणे अव्वलस्थानी हाेता. याच शतकाच्या बळावर त्याने याच फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक धावांची २२०३ नाेंद अापल्या नावे केली.
अधिक वाचा : आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये ‘द वॉल’ द्रविड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola