एअर इंडियाचे सुमारे ५०० कर्मचारी बुधवारी रात्री ११ वाजल्यापासून अचानक संपावर गेले असून त्यामुळं एअर इंडियाच्या विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. या संपामुळं अनेक विमानांची उड्डाणं रखडली असून ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होत आहे.
संपावर गेलेले सर्व कर्मचारी अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे कर्मचारी आहेत. या सगळ्यांना कंत्राटी तत्वावर रुजू करण्यात आले होते. २५ ते ३० वर्षे होऊनही यातील अनेक कर्मचाऱ्यांना नियमित करून घेण्यात आलेले नाही. त्यांचा पगार नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. तसंच नियमित कर्मचारी निवृत्त झाल्यावर कंत्राटी कामगारांचा विचार न करता नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. कमी पगार देऊन भरपूर छळ केला जातो, असा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून बडतर्फ करण्यात आले. एअर इंडियाच्या या तुघलकी कारभारामुळे कर्मचारी संतापले आहेत. कंपनीत नियमित करून घ्या आणि पगार वाढवा, अशी त्यांची मागणी आहे.
अधिक वाचा : अहमदाबादचे आता ‘कर्णावती’ होणार नामकरण – गुजरात सरकार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola