अकोला(प्रतिनिधी) : पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना सरळ सेवा नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना जिल्हा अकोलाच्या वतीने ७ नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुनका भाकर भिक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातुन विविध मागण्या संघटनेच्या वतीने मांडण्यात येणार आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना सरळ सेवा नोकरीमध्ये महाराष्ट्रातील १८४६६ कर्मचाऱ्यांना समाविष्ट करुन घेण्यात यावे.पदवीधर अंशकालीन कर्मचारी डाटाबेस यादितील मय्यत व्यक्तींच्या वारसांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे.अध्यादेश जीआर त्वरीत काढण्यात यावा.यांसह अनेक मागण्यासाठी संघटनेच्या वतीने भिकमांगो आंदोलन करण्यात येणार आहे तरी अकोला जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डि.आर.गवई, उपाध्यक्ष अनंत साबदे,सचिव मिलिंद खुमकर यांनी केले आहे.या आंदोलनाला बिल्डींग पेंटर व बांधकाम मजुर संघटना अकोला जिल्हा सचिव प्रशांत मेश्राम यांनी जाहीर पाठींबा दर्शवला आहे.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघटनेने कळविले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola