तेल्हारा – तालुक्यातील भांबेरी येथील सुभाष दातकर यांची जागा हडप करणाऱ्या व्यक्तीस नियमबाह्य सहकार्य केल्याप्रकरणी येथील ग्राम विकास अधिकारी मूलचंद चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, भांबेरी गावात 1926 पासून माझ्या वडिलांची (तुकाराम दातकर) यांची 2400 स्वे फूट जागा आहे.ही जागा नातेवाईक असलेल्या केशव बोक्से याना वापरण्यास दिली होती. दरम्यानच्या काळात केशव बोक्से याने ग्रामविकास अधिकाऱ्याला हाताशी धरून ही जागा स्वतःच्या नावाने करून घेतली असा दातकर यांचा आरोप आहे. वडिलांच्या नावाचा फेरफार आठ अ मागितला असता चक्क केशव बोक्से यांच्या नावाचा फेरफार हातात मिळाला. याबाबत जाब विचारला असता चव्हाण यांनी गोलमाल उत्तरे देऊन बोक्से यांच्या करनाम्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या केशव बोक्से याना मदत करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मूलचंद चव्हाण यांना निलंबित करा अशी मगणी कुणबी समाजाचे अध्यक्ष व तक्रारकर्ते सुभाष दातकर यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दातकर यांनी दिला आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार भांबेरी येथील ग्राम विकास अधिकारी मूलचंद चव्हाण व केशव बोक्से यांनी संगनमत करून कागदपत्रांची हेराफेरी केली. मूळ मालकाच्या वारसाचे आवश्यक कागदोपत्री पुरावे असताना मूलचंद चव्हाण यांनी केशव बोक्से या व्यक्तीस सहकार्य करण्यामागे मोठे गौडबंगाल असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चव्हाण व बोकसे विरुद्ध बोगस कागदपत्र तयार करणे, ते कागदपत्र सत्य असल्याचे भासवून त्याची नोंद घेणे, मूळ मालकावर अन्याय करणे आणि अधिकाराचा दुरुपयोग करणे याबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी दातकर यांनी केली आहे.
अधिक वाचा : लोकजागर मंच शाखा भांबेरी आयोजित भव्य आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola