विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षक व शिक्षकेतर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती दिली जाईल. त्याचबरोबर तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त असल्याबाबत चर्चा ही सर्वदूर सुरु होती. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. अध्यापकांच्या ३,५८० जागा, शारिरीक शिक्षण संचालनालयातील १३९ जागा, ग्रंथपालांच्या १६३ जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ जागा अशी एकूण ४,७३८ पदे येत्या काळात भरण्यात येतील असेही तावडे यांनी सांगितले.
अधिक वाचा : परदेशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola