देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या १४३व्या जयंती निमित्त त्यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील साधू बेटावर करण्यात आले.
सरदार पटेल यांचे हे शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प आहे. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून मतमतांतरे आहेत. स्थानिक गावकऱ्यांसहीत काही जणांनी या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावर आक्षेप नोंदवला आहे. असे असले तरी हा पुतळा उभारण्याआधीपासूनच भारतामध्ये ३० मीटरहून अधिक उंच पुतळ्यांची संख्या २० हून अधिक आहे. ३० मीटरहून अधिक उंच पुतळे असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये २५ पुतळ्यांसहीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. ३० मीटरपेक्षा जास्त उंचीचे सर्वाधिक पुतळे चीनमध्ये आहेत. चीनमध्ये ३४ पुतळ्यांची उंची ३० मीटरहून अधिक आहे.
या पुतळ्यावर जवळपास ३००० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी सरदार पटेलांच्या वस्तूंचं वस्तूसंग्रहालय आहे. पद्मभूषण विजेते शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची संरचना तयार केली आहे. ३३ महिन्यात २५० अभियंते ३४०० मजूरांनी या पुतळ्याची निर्मीती केली आहे. या पुतळ्याच्या एका बाजूला अभयारण्य आहे तर दुसरीकडे नर्मदा नदी आहे . भौगोलिक स्थिती आणि या पुतळ्याचं सौंदर्य पाहता या पुतळ्यामुळे या परिसरातील पर्यटन वाढेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा : इंडोनशियात १८८ प्रवाशांना घेऊन समुद्रात कोसळलेल्या त्या विमानाचा पायलट ‘दिल्लीकर’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola