पुणे : पोलिस अधिकारी,कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी प्रत्येक पोलिस अधिकारी,कर्मचार्याच्या वर्दीवर ‘बॉडी कॅमेरा’ लावण्याचा निर्णय पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी घेतला आहे. त्याबरोबरच अशा लोकांना रोखण्यासाठी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमतेतही वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले.बेशिस्त वाहनचालकांना अडवून जाब विचारणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना ताजी असतानाच, दोन दिवसांपूर्वी महंमदवाडी पोलिस चौकीत हवालदार विनोद पोतदार यांना राजेश बधाले नावाच्या व्यक्तीने कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.
या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आता पोलिस अधिकारी,कर्मचारीही सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती एका सजग नागरिकाने ‘ट्विटर’द्वारे पुणे पोलिस आयुक्तांना कळवली होती. त्यावर आयुक्तांनी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्या ‘ट्विट’ला ‘रिप्लाय’ देताना डॉ. के. व्यंकटेशम यांनी म्हटले आहे, ‘पोलिस अधिकारी कर्मचार्यांवरील हल्ले रोखण्यासाठी काही उपाययोजना आखत आहोत. त्यात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘बॉडी कॅमेरा’ देणे, आरोपींना अद्दल घडविण्यासाठी कठोर कारवाई करणे, मे.न्यायालयात जलद खटला चालविणे आणि पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमतेत वाढ करणे याचा समावेश आहे.’पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वर्दीवर बॉडी कॅमेरा लावल्यानंतर हुज्जत घालणारे, वाद घालणारे आणि त्यांच्यावर हात उचलणारे सर्वच प्रकार टिपले जाणार आहे. त्यामुळे मारहाणीच्या घटनेत त्याचा सबळ पुरावा म्हणून मे.न्यायालयात वापर करणे शक्य होणार आहे.
अधिक वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola