अडगाव बु : बारा डिसेम्बर ला शिर्डी येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात जास्तीत जास्त संखेने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे या करिता शेतकरी संघटना च्या प्रचार सभेला अडगाव बु येथून सुरुवात करण्यात आली. तसेच दिल्ली येथे राहनारे स्वतंत्रवादी विचारसरणी चे पुरस्कर्ता आणि जागतिक लेखक बरुन मित्रा हे चार दिवसाच्या अकोट व तेल्हारा तालुक्याच्या दौरावर आहेत .त्यांना विदर्भातील ग्रामीण शेतकरी, शेतमजूर यांची नेमकी परिस्थित कशी आहे हे एकन्यास व स्वतंत्रवादी विचारसरणी वर मत वक्त करण्याकरिता आले होते .शरद जोशी यानी सांगितले होते की या देशातील सर्व शेती मालावार उने अनुदान आहे आणि जागतिक व्यापार संघठन सोबत करार करतांना तत्कालीन शासनाने यांची आकडेवारी सुद्धा जाहिर केलि आहे .आजही शेती उने अनुदान च मिलत असल्याने देशातील सर्व शेतकरयांची दिल्ली ते गल्ली पर्यन्त सर्वांचिच परिस्थित जवळ जवळ सारखीच आहे .कुठ थोडा फार फरक असु शकतो .
आपल्या भागातील माहिती त्यांना माजी सरपंच अशोक भाऊ घाटे यानी दिली. शेतकरयांची परिस्थित खुप बिकट आहे . आम्हाला काहीतरी मिळाले पाहिजे याचाच विचार करत आहे पन आपले हक्क क़ाय हे जाणून घेण्यास उदासीन दिसत आहे. परिस्थिति ने ग्रामीण भागात उदासीनता पसरलेली आहे .लवकरच यावर उपाय न झाल्यास गंभीर परिस्थिति उभी राहु शकते अस मत त्यानी वक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य गोपाल भाऊ कोल्हे यांनी मत वक्त केले की शासनाकडे योजना खुप आहेत पन त्याला लावण्यात येणारे निकष हे त्रास दायक आहेत.योजने चा लाभ घेण्याकरिता अनावश्यक कागद पत्र ची मागणी शासन करत असल्याने जनतेला लाभ मिळवून देने शक्य होत नाही .शेतकरयांचे प्रश्न खुप मोठा आणि बिकट आहे .जनतेने जात, धर्म, आणि पक्षाचे राजकारण मागे ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्ना वर एकत्र येण्याची गरज आहे .शेतकरी संघटना ही शेतकरयांकरिता प्रामाणिकतेने लढा देत आहे ,गावागावात जात आहे ,शेतकरयांचे हक्क शेतकऱ्यांना समजवून सांगत आहे .अश्या संघटनेच्या पाठीशी शेतकऱ्यांनि उभी राहण्याची वेळ आलेली आहे .राजकारणी व्यक्ति ने एक पावुल पुढे टाकत शेतकरी प्रश्ननावर एकत्रित यावे अस मत वक्त केले.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ललित दादा बहाळे यांनी शेती विरोधी कायदे हे शेतकऱ्यांच्या प्रगती मधे बाधा बनत आहे .या देशात आजपर्यंत कोणत्याही पक्षाचे सरकार निवडून आले तरी ते शेतकऱ्यांच्या विरोधात काम करते कारण बियाने नियंत्रक कायद्या पासून कृषि उत्पन्न बाजार समिति कायद्या (apmc एक्ट) या देशात अस्तित्वात आहे .ज्या मुळे नवीन जाणुकीय तंत्रधान शेतकऱ्यांना मिळत नाही .बोड अळी यायच्या आधी शासनाने बी.टी. ट्रायल वर बंदी केलि नसती तर बोड अळी ला आळा बसु शकला असता .बोड अळी करिता मदत म्हणून शासनाकडे हात पसरण्याची वेळ शेतकरया वर आली नसती .शासनाने तंत्रधान ची मोकळीक शेतकऱ्यांना द्यावी तसेच बाजारपेठ मधील शासकीय हस्तक्षेप बंद करावा .अस मत त्यांनी वक्त केले.
शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणतीही राजकीय शक्ति उभी राहत नाही. शेतकऱ्यांच्या जवळ पैसा ही नाही.शेतकऱ्यांच्या जवळ फक्त संख्या आहे .या संखेची शक्ति सरकार ला दाखवाने आवश्यक झाले आहे कारण हे सरकार बहुमतात आहे .शेतकरी संघटनेचे चौदावे अधिवेशन 10,11,12 डिसेम्बर ला होणार असून या अधिवेषणाची प्रमुख मागणी ही संपूर्ण कर्जमुक्ति ही आहे .शिर्डी अधिवेशनात 15 लाख शेतकरी जमाल्यास कोणत्याही सरकार ला शेतकरयांची सम्पूर्ण कर्जमुक्ति केल्याशिवाय पुन्हा सत्तेत येणे काठिन आहे अस लक्षात येईल व सर्वच पक्ष मतांच्या लालसे पाई से श्रेय घेण्याकरिता समोर येतील व आपणास कर्जमुक्ति मिळेल. म्हणून गावातून जास्तीत जास्त संखेने पुरुष व महिला शेतकऱ्यांनी या अधिवेषणाला शिर्डी येथे उपस्थित राहन्याकरिता निमंत्रण दिले.
सभेचे सूत्र संचालन तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी केले .सभेचे आयोजन तालुका युवा आघाडी नीलेश नेमाडे आणि शेतकरी संघटना गाव प्रमुख अमोल मसुरकार यांनी केले .या सभेला उपस्थित सेंट्रल कृषि सेवा सोसायटी चे संचालक गजानन मुगसे, अकोट युवा आघाडी विक्रांत बोन्द्रे, राहुल बहाळे,सतीश सरोदे,अनिल मानकर, जाफर खाँ, गोपाल निमकर्डे,मोहन खिरोडकर, संजय ढोकने, मंगेश रेळे,विलास इंगळे,सुरेश सोनोने, माणिक घाटे, शशि रत्नपारखी,अ. तहरीर, सुरेश थुटे, राजेश तायडे, गजानन निमकर्डे,सोपान इंगळे,गोपाल राजनकर,एजाज अली मिरसाहेब, शालिग्राम मानकर, अ. अकील, कमलाकर वानखडे,सुनील कळसकर,अ. बशीर, देवीदास ढोकने,माधव घाटे,नितिन ढोकने,पंकज इंगळे,सोपान इंगळे,तस्लीम अली मिरसाहेब, बाळू आंबेकर,समस्त शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि गावकारी उपस्तित होते.
अधिक वाचा : अकोला शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांचा सोशल ऑडिटचा अहवाल जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola