तेल्हारा (प्रतिनिधी) : भुसावळ च्या महिलांनि केला वेगळाच उपक्रम भुसावळ येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थे तर्फे आज सेंट. मेरी प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कुल मधे भुलाबाई महोत्सव साजरा केला पूर्वी च्या काळात महिला मुलींना समाजात हीन लेखल्या जात होते परंतू आज विधन्यानाच्या युगात महिला पुरुषांच्या खांध्याला खांदा लावूनच नव्हे तर पुरुषांच्या तुलनेत प्रत्येक क्षेत्रात बाजी मारत आहेत आज माता सावित्रीने या महिलांना जे स्वातंत्र्य दिल ते एक महिला शक्ती करिता वरदानच ठरलं आहे.
स्त्री हि दोन कुटुंबाना घेऊन चालणारी आहे तिचे अख्खे जीवन मुलांचा सांभाळ करणे घरातील सर्व कामे करणे येवठे करून तीला जणू तिचा विसरच पडला की काय? तिच्या लहानपणीच्या भुलाबाई ती आता विसरत चालली आज मोबाईल इंटरनेट च्या युगात ती तिचे खेळ विसरली आणि याचीच उणीव भरून काढण्यासाठी या भुलाबाई महोत्सवाच्या रूपाने ते दिवस आठवले.
या महोत्सवास प्रमुख पाहुण्या म्हणून मारवाडी समाज मंडल च्या अध्यक्षा सौ. भारती ताई राठी ह्या उपस्थीत होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारती ताईंनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की मला भुलाबाई महोत्सवाचे ऐकुन खुप आनंद झाला जुन्या आठवणी जागे झाल्या. पुन्हा ती म्हण आठवली गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .
आज ची पिढी हे सर्व विसरत चालली आहे. पाश्चात्य संस्कृती मुळे खरी संस्कृती लोप पावत चालली आहे अशा कार्यक्रमाची आज गरज आहे. संस्थेच्या संस्थापिकांचे खरच कौतुक करण्यासारखे आहे. की ते आपली संस्कृती व परंपरा टीकवण्या साठी त्यांनी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन खुपच छान पध्दतीने केले.
द्वितिय सत्रात कार्यक्रमाला हायकोर्ट च्या सुप्रसिध्द अॅड. सौ. मेघाताई प्रशांत वैष्णव ह्या लाभल्या. यांनी ही भुलाबाई महोत्सवाचे खुप कौतुक केले. तसेच महिला सशक्तीकरण बाबतीत व महिला सुरक्षा कायद्यांची माहिती दिली त्यांनी पण अशा सांकृतिक कार्यक्रमाला आपली आवड दर्शवली.
भुसावळ मधे सांकृतिक कार्यक्रम खुप कमी प्रमाणात होतात. व त्यात महिला घरा बाहेर पडत नाहीत, आपली संस्कृती व परंपरा टिकुन रहावी व त्याच बरोबर महिलांना ही आपल्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी आपण भुलाबाई महोत्सवाचे आयोजन केले असे मत संस्थेच्या संस्थापिका सौ.राजश्री उमेश नेवे यांनी व्यक्त केले.
यावेळी विविध खाद्यपदार्थां चे विविध वस्तुंचे स्टाॅल्स देखिल महिलांनी लावले होते. व विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक
रांगोळी स्पर्धा – प्रथम क्रमांक अंकिता राणे, द्वितीय क्रमांक ममता हरिमकर , तृतीय क्रमांक संजना इंगळे यांनी पटकावले.
पाक कला स्पर्धा – प्रथम क्रमांक सौ. वंदना भावसार, दुसरा क्रमांक आरती देशपांडे यांनी बाजी मारली.
पुजेची थाळी सजवणे – प्रथम अंकिता राणे, द्वितीय क्रमांक संजना इंगळे यांनी पटकावला
स्मरण शक्ती स्पर्धा – प्रथम क्रमांक अंकिता राणे, द्वितीय क्रमांक सौ. दर्पणा कुलकर्णी ह्या विजेत्या ठरल्या
क्विझ काॅण्टेस्ट – सौ. कामिनी नेवे व सौ. माया चौधरी ह्या प्रथम क्रमांकावर तर सौ. दर्पणा कुलकर्णी व संजना इंगळे यांनी दुसरा क्रमांक राखून ठेवला. अशा उत्साहात भुलाबाई महोत्सव आनंदाने पार पडला. या वेळी सुत्र संचालन सौ. कामिनी नेवे यांनी केले.
आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा विसपुते यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माया चौधरी, मनिषा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. पुजा लुल्ला ,राजश्री संघमित्रा फाउंडेशन च्या अध्यक्षा राजश्री ताई सुरवाडे, राधिका वाणी, भारती वाणी, भाग्यश्री वाणी व भाग्यश्री नेवे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : पत्रकार सत्यशील सावरकर यांना संघर्ष पुरस्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola