अकोट (प्रतिनिधी) : अकोट शहर हे अतिसंवेदनशील शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे अकोट शहराची संवेदनशील शहर ही ओळख निर्माण होण्यासाठी पूर्वी झालेल्या जातीय दंगली कारणीभूत आहेत शहराच्या इतिहास मध्ये आज पावेतो छोट्या मोठ्या २६ दंगलीची नोंद असुन सन २०१२मध्ये दुर्गा विसर्जन दरम्यान अकोट शहरात दोन समाजा मध्ये खूप मोठीं दंगल पेटली होती ,ज्या मध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाली.
अकोट शहरातील सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षितेची भावना नेहमी दिसुन यायची व्यापारी वर्ग थोड्या थोड्या अफवा वर लगेच आपली व्यापारी प्रतिष्ठाणे बंद करायचे अश्या वातावरणात महीला लहान मुलाचा सहभाग कावड, गणेशोत्सव नवदुर्गा विसर्जन मार्गावर येण्यास टाळत असायच्या एवढी दहशत महिला वर्गाच्या मनात होती, परंतु ह्या वर्षीच्या कावड, गणेश विसर्जन व दुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांची व लहान मुलाची प्रचंड गर्दी वाढलेली दिसुन आली हा अकोट शहरातील नागरिकां मध्ये अकोट शहर पोलीसाच्या सोशल पोलीसिगचा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता त्याच प्रमाणे दुर्गा विसर्जन शांततेत व्हावा म्हणून मुस्लिम बांधवांचा सक्रिय सहभाग हा ठाणेदार शेळकेचा तेवढाच महत्वांचा सोशल पोलीसीगचा भाग म्हणावा की अकोट शहरातील २०१२ मध्ये संवेदनशील ठरलेल्या भागातील जवळपास ४० मुस्लिम तरुण व बुजुर्ग मुस्लिम बांधवानी दुर्गा विसर्जनाच्या मार्गावर शांतता ठेवण्या साठी सक्रिय सहभागी होण्याची विनंती पोलिस निरीक्षक गजानन शेळके ना केली, ते मान्य करत मुस्लिम बांधवाना त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करून त्यांचा नवदुर्गा मिरवणुकीत सक्रिय सहभाग करुन घेतला त्यासाठी त्यांना ओळखपत्र सुद्धा देण्यात आले होती. तसेच अकोट नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत बदोंबस्त करण्याकरीता जिल्हासह बाहेरुन आलेल्या पोलीसा सह इतर सुरक्षाबलान साठी शंभु सरकार ग्रुप मंडळाचे देवा चंदु दुबे व महाराष्ट्र पोलिस बॉईज ह्यांनी जवळ पास ६०० कर्मचाऱ्या साठी जेवण, पाणी चहा ह्याची व्यवस्था केली होती.
अकोट शहर ठाणेदार गजानन शेळंके यांनी गेल्या वर्षभरापासुन अकोट शहरात सोशल पोलीसिग करीत नव नवीन प्रयोगाचे फलीत की आज सामान्य अकोट कर जनता व पोलीस जेव्हा एकमेकांवर विश्वास ठेवून एक मेकांना सहकार्य करतात तेव्हा अकोट शहरा सारख्या संवेदनशील शहरात सुद्धा शांतता नांदत आहे हे यावरुन दिसून येत आहे.
अधिक वाचा : दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरात पोलिसांचा रूट मार्च
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola