अकोला : संभाजी ब्रिगेडच्या पक्ष संघटनेमधे जिल्हा भरात प्रचंड झपाट्याने वाढ होत असताना. संभाजी ब्रिगेडचा शेतकरी कष्टकरी व कामगार मतदारांच्या प्रश्नांवरती विचारमंथन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे अकोला जिल्हा अधीवेशन आज दि. २१ ऑक्टोंबर २०१८ रोजी स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजीत करण्यात आले आहे. ह्या अधीवेशनाला जिल्हाभरातील कार्यकर्ते, पदाधीकारी , शेतकरी व शेतमजुर ह्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संघटक कपिल ढोके ह्यांनी केले आहे.
सदर अधीवेषना मधे उद्घाटक म्हणुन प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे , तर अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर लाभणार आहेत. तर प्रमुख मार्गदशक म्हणुन संभाजीब्रिगेड राज्य नेते ॲड. अनंत चोंदे व बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थीतीत प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी , सुधीर देशमुख , प्रदेश संघटक कपिल ढोके , विभागीय अध्यक्ष पंकज जायले , केंद्रीय निरीक्षक प्रेमकुमार बोके , डॉ. अभय गावंडे , मसेसंघ जिल्हाअध्यक्ष अशोक पटोकार , मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम तायडे , प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे , वि. उपाध्यक्ष संजय गुप्ता, वि. सचिव अभिजीत मोरे, वि. कार्याध्यक्ष रवी महाले हे उपस्थीत राहाणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर भगवान गावंडे ह्यांचा क्रांतीकारी शाहीरी व पोवाड्यांचा कार्यक्रम राहणार आहे. अधीवेशनामधे प्रमुख आकर्षण म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशाम दरोडे हा शेतकऱ्यांच्या समस्या व सरकारचा नाकर्तेपणा ह्या विषयावर भाषण करणार आहे.
संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा शाखेतर्फे साहीत्य कला क्रिडा शिक्षण व शेती क्षेत्रातील गुणवंत ह्यांना संभाजी महाराज युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. ह्या अधीवेशनामधे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती ठराव घेण्यात येणार आहेत. तरी ह्या अधीवेशनासाठी हजारोंच्या संखेने उपस्थीत राहण्याचे आवाहन प्रदेश संघटक कपिल ढोके ह्यांनी एका प्रसीद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अधिक वाचा : अकोला जिल्यातील एका आमदाराचा प्रताप, भरचौकात चहाविक्रेत्याला केली जबर मारहाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola