हिवरखेड (दिपक रेळे) : दोन वर्षांपूर्वी आई व 6 महिन्यापूर्वी वडील किसन मावसकार याने सोडून दिलेल्या अनाथ जीवन जगणाऱ्या आरती व भारती ला रंगनाथ महाराज आश्रम शाळा येथे प्रवेशीत करून अडगाव पत्रकार संघाच्या सहकार्याने अष्टमीला ज्ञानयज्ञ प्रज्वलित करण्यात आला.
हिवरखेड सोनाळा मार्गावरील डॉ.राम तिडके यांच्या शेतात वास्तव्यास असणाऱ्या आपल्या चुलत आजी आजोबा यांच्याकडे 6 महिन्यापासून त्या राहत होत्या. तेल्हारा तालुका बाल रक्षक तुळशीदास खिरोडकर यांना माहिती मिळताच संपर्क करून या दोघींना आश्रम शाळा अडगाव बु. येथे दाखल करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.पत्रकार संघाने शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य प्रवेशाचे दरम्यान ह्या अनाथ भगिनींना भेट देत सामाजिक दायित्व जपून सहकार्याचा हाथ दिला.
ह्या दोन्ही भगिनींना शिक्षण मिळावे यासाठी हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब नेरकर व उमेश तिडके त्यांनी विशेष पुढाकार घेतला. समाज सहयोगातून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळा येथे कार्यरत शिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी यावर्षी सात शाळाबाह्य मुलामुलींना शाळा प्रवाहात आणले आहे.आरती व भारतीच्या शाळा प्रवेश प्रसंगी अडगाव पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्याम कोल्हे सचिव नीलेश पत्की पत्रकार दीपक रेळे तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन अपाले; संजय लोणकर; सीमा बोळे सह शिक्षक वृंद हजर होते . याप्रसगीं सतं गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड चे प्रतिनिधी डा .धूळेसाहेब जयेश बोहरा, प्रविन येऊल, कीरण सेदाणी, बंजरग तिडके, मनिष राठी दिलिप नाठे, अनिल कराळे, रवि मानकर, बाळासाहेब नेरकर या पदाधीकारर्यानी अडगावच्या पञकार व तुलशिदास खिरौडकार व ऊमेश तीडके याचें ज्ञाणदानाचे कार्याला मनपुर्वक सूभेच्छा दिल्या.
अधिक वाचा : काळेगाव येथील चोरी प्रकरण आरोपीस अटक; चोरीतील मुद्देमाल हस्ते गत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola