बाळापूर :- बौद्ध बांधव उत्सव समिती बाळापूर कडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धम्म अभियान देहू रोड पुणे येथील रथाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळी 8 वाजता खामगाव नाका येथून धम्म रथाची लेझीम पथकासह व ढोलताशा सह भव्य मिरवणुक आयोजित केली होती. धम्म रथाचे वाजत गाजत बौद्ध विहार येथे आगमन झाले. सकाळी 9 वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली. सकाळी 10 ते 11 या वेळेत धम्म रथाचे प्रमुख संयोजक मा.प्रा.दि.वा.बागुल सर यांच्या धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 ते 12 या वेळेत बाहेरगावाहून आलेल्या उपासक आणि उपासिकांना अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बौद्ध बांधव उत्सव समितीचे अध्यक्ष मा.नाजुकरावजी उमाळे, उपाध्यक्ष मा. देवानंदजी इंगळे सचिव कृष्णाभाऊ तेलगोटे, राम डोंगरे, कपिल उमाळे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. यावेळी विविध विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व कार्यक्रमाची सांगता झाल्यावर ह्या धम्म रथाचे दिक्षा भूमी नागपुर येथे आयोजित असलेल्या 62 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास प्रस्थान झाले.