अकोला : समाजातील अंतिम घटकाचा विकास व्हावा, यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे त्या योजनांची माहिती शेवटच्या घटकाला होणे. याच हेतूने शासकीय योजनांची माहिती व्यक्तीअनुरुप पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या. यांनी संयुक्तपणे ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलची निर्मिती केली आहे.
‘महालाभार्थी’ वेबपोर्टलवर नागरिक गरजेनुसार आवश्यक माहिती भरुन योजनांसाठी आपली पात्रता पडताळून पाहू शकतात. या योजना कोणत्या, त्याचे कोण लाभ घेऊ शकतात आणि ते लाभ कसे घ्यायचे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कुणाशी संपर्क करायचा याची संपूर्ण माहिती या वेबपोर्टलवर आहे. या संबंधीचे मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीसह एक पत्र लाभार्थ्याला देण्याची व्यवस्था या वेबपोर्टलवर आहे. विविध योजनांचे विहित नमुन्यातील अर्ज आणि त्यासंबंधीचे शासन निर्णयसुध्दा उपलब्धतेनुसार डाऊनलोड करता येतात.
‘महालाभार्थी’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिक योजनांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करु शकतील. त्यांची अंतिम पात्रता संबंधित विभागाचे अधिकारी निश्चित करणार आहेत. ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलसारख्या डिजिटल माध्यमातून विविध योजनांचे लाभ त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आणखी सुकर होणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी ‘महालाभार्थी’ या वेबपोर्टलवर नोंदणी करुन घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करणार आहे. यामुळे विविध विभागांच्या शासकीय योजनांसाठीच्या संभाव्य लाभार्थ्यांची माहिती पुढे येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलचा (cmo.maharashtra.gov.in) लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola