परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक तालुके दुष्काळी असल्याचे राज्य सरकारच्या प्राथमिक पहाणी अहवालात स्पष्ट झाले आहे. या दुष्काळी तालुक्यांना तातडीची मदत करण्याची गरज असून, त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदत मागणार आहे.
जुलैनंतर राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम अडचणीत आला असून, अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागाचे दौरे करण्याचे आदेश दिले असून, हे दौरे सुरूही झाले आहेत. राज्याच्या प्रशासनाने या दुष्काळसदृश परिस्थितीची पहाणी सुरू केली असून, प्राथमिक अंदाजानुसार २००पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. या तालुक्यांना तातडीने मदत केली गेली नाही तर तेथील परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे या तालुक्यांना ‘दुष्काळसदृश’ जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
दुष्काळी भागासाठी केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, यासाठी राज्यातील दुष्काळी स्थितीचा अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहे. केंद्राचे पथक पहाणी करायला येईल. परंतु त्यापूर्वी दुष्काळी गावांना तातडीने मदत करण्यासाठी मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहेत.
पुन्हा ‘टँकर’राज!
दुष्काळाचा मोठी झळ ही मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसली आहे. लातूरमध्ये तर पिण्याच्या पाण्याची टंचाई आत्तापासूनच जाणवू लागली आहे. पुढील काही महिन्यांत या भागांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेत भाजपचे 50 आमदार नापास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola