संत गाडगेबाबा अमरावती विद्यापी’स्तरीय हॉकी स्पर्धेत बार्शिटाकळी व अमरावती संघातील खेळाडूंना मारहाण झाल्याची घटना शनिवार, १३ ऑक्टोबर रोजी घडली. यामध्ये दोन्ही संघाना स्पर्धेतून बाद करण्यात आले आहे. संत गाडगेबााबा अमरावती विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचे आयोजन केसरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत एवूउण ५ महाविद्यालयाच्या संघानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये विद्याभारती महाविद्यालय अमरावती व उस्मान आझाद महाविद्यालय बार्शिटाकळी यांच्यामध्ये हॉकीचा सामना खेळविण्यात आला. यामध्ये मध्यांतरापर्यंत निकाल ०-१ असा झाला होता. मध्यांतरानंतर पंचाचा निर्णय व तांत्रिक कारणाने खेळाडूंनी खिलाडूवृत्ती न दाखविता एकमेकांना मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच पंचांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी पंचासह दोन्ही संघातील १५ च्या जवळपास खेळाडू गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र प्रसंगावधान राखत पंचाधिकाNयांनी दोन्ही संघाना स्पर्धेतून बाद केले आहे. यावेळी उस्मान आझाद महाविद्यालयाच्या खेळाडूंना बडनेरापर्यंत गाडीतून सोडण्यात आले; मात्र शैक्षणिक नुकसान होवू नये याकरीता तक्रार देण्याचे त्यांनी टाळले आहे.
विद्यापी’स्तरीय हॉकी स्पर्धेत घडलेली बाब खेळ व खेळाडूंच्या विकासाच्या दृष्टीने अप्रिय आहे. याबाबत विद्यापीठाकडे कु’ल्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे विद्यापी’स्तराहून स्वतंत्र निर्णय घेण्यात आलेला नाही; मात्र स्पर्धेतून दोन्ही संघ बाद करण्यात आलेले आहेत – अविनाश असनारे (संचालक, क्रिडा व शारीरीक शिक्षा विभाग)
अधिक वाचा : विद्युत भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola