अकोट (शब्बीर खान) : अकोट शहरा मध्ये ७४ सार्वजनिक दुर्गा देवी व १३ शारदा देवीची स्थापना झाली असून दिनांक १० ऑक्टोम्बर पासून अकोट शहर वासी भक्तिरसात न्हाऊन निघत आहेत, शहरातील प्रमुख देवीच्या मंदिरात भक्तांची विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी दुर्गा देवीचे विसर्जन होणार असून,त्यानिमित्ताने भव्य मिरवणुका निघणार आहेत ,ज्या मध्ये एकूण ४० सार्वजनिक दुर्गा मंडळे सामील होणार आहेत, ह्या मिरवणुका मध्ये १० ते १२ हजार लोक सामील होण्याची शक्यता असून, महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो, अशा वेळी अकोट शहरातील कायदा व सुवयवस्था अबाधित रहावी म्हणून आज दिनांक १४ ऑक्टोबर रोजी अकोट शहरात पोलिसांतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले, विसर्जन मार्गाने भव्य रूट मार्च काढण्यात आला. ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे नेतृत्वात निघालेल्या सदर रूट मार्च मध्ये RCP, SRPF , होमगार्ड, पोलीस स्टेशन चे कर्मचारी असे जवळ पास १५० कर्मचारी सहभागी झाले होते तसेच अकोट शहरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, साहाय्यक पोलिस निरीक्षक फड, पोलीस उपनिरीक्षक गवई, सोळंके, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक बहाकार हे देखील सहभागी झाले होते.
अधिक वाचा : कालवाडी शिवारात ११ जुगाऱ्याकडून २.२६ लाखाचा मुद्देमाल जप्त अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola