अकोट(प्रतिनिधी ): अकोट तालुक्यातील कालवाडी शेत शिवारात सुरू असलेल्या जुगारावर शुक्रवारच्या सायंकाळी डीबी पथकाने धाड टाकली.यावेळी ४ जुगाऱ्याना पकडले तर ७ जण फरार झाले.जुगाऱ्याकडून २ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कालवाडी शेतशिवारात जुगार सुरू असल्याची माहिती ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली,त्यांनी तत्काळ डीबी पथकाला याकामी रवाना केले. पथकाने जुगारावर धाड टाकली.यावेळी जयराम राजाराम बैरीसाल (४०) रा.सुदर्शन कॉलनी अकोट, नरेश काशीनाथ गायकी (३०) जोशी वाडी अकोट,कुणाल विश्वास वानखडे (२४) वडाळी सटवाई,जगदीश राजाराम मनवर (३०) शिवाजी महाविद्यालय मागे अकोट यांना जागेवर पकडले तर तिलक राजू मर्दाने, संदीप हिम्मत चांडालिया, विशाल रामनाथ सत्याल सह ४ जण फरार झाले.जुगाऱ्याकडुन ५ दुचाक्या,३ मोबाईल व रोख ८ हजार २३० रुपये,असा एकूण २ लक्ष २६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे,ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नारायण वाडेकर,नापोशी गजानन भगत, पोकॉ. अनिल शिरसाट,प्रवीण गवळी,अविनाश आडे,नंदकिशोर कुलट यांनी केली.