मूर्तीजापुर (प्रकाश श्रीवास) : येथील बसस्थानकाची दिवसेंदिवस गंभीर अवस्था निर्माण होत असुन याकडे महामंडळ प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक झाले असल्याचे चित्र गूरूवारी पहावयास मिळाले.बसस्थानकावरील चौकशी कक्षा समोर असलेल्या छताचा एक तुकडा आपोआपच खाली पडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. पण अवेळी गजबजलेल्या बसस्थानकावरील छताचा एक कोपरा अचानक पडल्याने प्रवाश्यामधुन महामंडळ प्रशासना विरुद्ध तिव्र नाराजीचा सुर उमटत आहे. जेव्हा छताचा एक कोपरा अचानक खाली पडला तेव्हा त्या परीसरात बरेच प्रवासी बसची वाट पहात उभे होते. मात्र कोणत्याही प्रवाश्याना इजा पोहचली नाही. मूर्तीजापुर बसस्थानकाची निर्मिती दि.२६ एप्रिल १०८० मध्ये झाली. तेव्हा पासून आजपर्यंत या बसस्थानकाची कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर कलर देखील मारण्यात आले नाही. कित्येक वर्षानंतर केवळफक्त मोठ्या प्रमाणात जिर्ण झालेली इलेक्ट्रीक फिटींग महामंडळ प्रशासनाने करून नाही निदान नवीन लाईट लावले खरी पण अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या बसस्थानकाचे छताची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची दुरूस्ती महामंडळ प्रशासनाने न केल्यामुळे आजरोजी हे बसस्थानक जिर्ण झाले असल्याने प्रवाश्याच्या जिवीत्वास धोका निर्माण झाला आहे.
तब्बल अडोतीस वर्ष या बसस्थाकाच्या निर्मितीस झाले असल्याची माहिती मिळाली आहे. महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी येणे जाणे करतात पण स्थानकांची झालेली अवस्था कोणीच पहात नाही. अनेकदा निवेदने देऊनही महामंडळ प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने सादी चौकशी देखील केली नसल्याची माहिती समोर आली आहे. अधिकारी येतात आणि आगारातुनच परत जातात. बसस्थानकाच्या छताची एवढी मोठी गंभीर अवस्था झाली की दरवर्षी पावसाळ्यात छत पावसाचे पाण्यामुळे गळत असल्याने पावसाचे पाणी स्थानकावरील बेंचेस वर गळत असल्याने पावसाळ्यात प्रवाश्याना बसण्याकरीता जागा अपुरी पडते.
पुर्वीच जागा कमी आणि त्यात स्थानकांची ही अवस्था पाहून प्रवाश्यामधुन महामंडळ प्रशासनाविरूध तिव्र नाराजीचा सुर उमटत आहे. अपुरी सुविधा असल्याने प्रवाशी संख्या कमी होत चालली आहे. याचा फायदा मात्र अवैध वाहतुकीस होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र महामंडळ प्रशासन प्रवाश्याना सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहे. जिर्ण झालेल्या बसस्थानकाचे छताचा एक कोपरा सलग दोन वेळा पडला.मात्र महामंडळाच्या एकाही अधिकाऱ्यांनी येवून साधे पाहिले देखील नाही. ही मोठी खेदजनक बाब आहे. फक्त प्रवाशी वाढवा हेच त्यांचे उद्देश आहे. मात्र प्रवाश्याना सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासन असमर्थ असल्याचे ही प्रवाश्यामधुन बोलले जात आहे. एकाच आठवड्यात दोन वेळा छताचा कोपरा आपोआप पडणे. ही मोठी गंभीर बाब आहे. महामंडळ प्रशासनाने यांची गंभीर दखल घेऊन तात्काळ छताची दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गामधुन होत आहे.
अधिक वाचा : मंदुरा हत्या प्रकरणातील आरोपीना अटक करा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola