पातूर(सुनील गाडगे) : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून ही योजना सदोष पद्धतीने राबवित असल्याने या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे यामध्ये आजी-माजी नगरसेवकांना उच्च न्यायालय पूरक खंडपीठाने प्रतिवादी म्हणून नोटीस बजावल्या होत्या परंतु या प्रकरणी न्यायालयात प्रतिज्ञालेख सादर न करणाऱ्या आजी-माजी नगरसेवकांना जमीनपात्र अटक वॉरंट व १० हजारन दंड आकारण्यात आला. याप्रकरणी 31 ऑक्टोंबर रोजी सदर नगरसेवकांना हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला आहे.
शहरात एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत सन 2012 मध्ये दारिद्र रेषेखालील लाभार्थी घरकुल बांधण्याची योजना राबविण्याची योजना होती त्यासाठी पाठवू नगरपरिषदेने शेत खरेदी सुद्धा केले होते या घरकुल योजना अंतर्गत काही घरकुल बांधण्यात आले होते. परंतु ही योजना राबवितांना यामध्ये तात्कालीन सात अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप होत असून हे प्रकरण आता तात्कालिक सत्तेवर असलेल्यांनी नेता केली असल्याचा आरोप होत आहे. या योजने मध्ये शहराबाहेर असलेल्या शिर्ला हद्दीतील तसेच नोकरीमध्ये असलेल्या अनेकांना योजनेचा लाभ देण्यात आला यामुळे शहरात राहणारे अनेक लोक हे या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. शहरातील घरकुल योजनेचा बांधकामाची सुद्धा दोषपूर्ण आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात व अनियमिता झाल्याचा आरोप होता. याप्रकरणी सै. एजाज हाजी सै. अय्युब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या योजनेअंतर्गत 126 घरकुलांची चौकशी देखील करण्यात आली. यामध्ये या योजने मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. या योजनेअंतर्गत ज्या लोकांना लाभ देण्यात आला त्यामधील अनेक लाभार्थ्यांच्या फाईल कार्यालयातून गायब असल्याचे सुद्धा चौकशीमध्ये समोर आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना प्रतिवादी केले होते. या आजी-माजी नगरसेवकांना उच्च न्यायालयात अधाप आपले प्रतिज्ञालेख सादर केले नाही. अशा आजी माजी नगरसेवक यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट होता रुपये उच्च न्यायालय सोबतच 49 फाईल गायब असून न प चे उपअधीदर्शक गाजी उर रेहमान देत नसल्याने पत्र मुख्याधिकारी यांनी पोलिसात दिले या पत्रावरून सुद्धा उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत ठोस कारवाई करण्याचे निर्देश याने दिली आहे पातुर घरकुल घोटाळेबाजाचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : पातूर येथे विहीरीत पाय घसरुन एका इसमाचा मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola