तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यु सदृश्य रोगाची लागण शहरातील नागरिकांना होत असताना तर काही चिमुकले या डेंग्यु सारख्या भयंकर रोगाला बळी पडलेले असतांना न प प्रशासनाने डेंग्यु सारखा रोग पसरू नये यासाठी उपाययोजनांचे आश्वासन नागरिकांना दिले होते मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा न प कडून कुठलेच पाउल अद्याप पर्यन्त उचलले गेले नसल्याने न प ला आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील दवाखाने रुग्णांनानि हाऊस फुल झाले असून काही रुग्णामध्ये डेंग्यु सदृश रोगाची तर काहींना डेंग्यु रोगाची लागण झाली आहे.याबाबत शहरातील नागरिकांनी पत्रकारांनी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली होती.त्यामध्ये गेल्या आठ दिवसां पहिले मुख्याधिकारी आकोटकर यांनी आश्वासन दिले होते की डेंग्यु संदर्भात उपाय योजना करू मात्र आठ दिवसाचा कालावधी उलुटून सुद्धा कुठलेच साधे या बाबत पाऊल उचलल्या गेले नाही.तर न प पदाधिकारी यांनी सुद्धा आपल्या कर्तव्यप्रति शहरातील या समस्यांवर उपाय योजना करण्याचे आदेश प्रशासनाला द्यायचे होते मात्र कुठल्याच पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला नसल्याने प्रशासन सुद्धा ढिम्म कारभार चालवत आहे.एखाद्याचा या डेंग्यु रोगाने बळी गेल्यावरच जाग येणार का असा सवाल जनतेला पडला आहे.
अधिक वाचा : व्हिडिओ : तेल्हारा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola