अकोट(प्रतिनिधी) : तालुक्यातील मुडगाव येथील शेतकरी विलास हिम्मतराव बहादुरे यांनी शासनाच्या हमी भावानुसार नाफेडला तुर विकुन ५ महिने पेक्षा जास्त कालावधी झाला असुन अद्यापही त्याना व त्याच्या सारखे गावातील १७ व तालुक्यातील ७० शेतकऱ्याना अद्यापही नाफेड कडुन तुरीची मोबदला रक्कम मिळाली नव्हती त्यासाठी सबंधीकडे वारवार चकरा मारुन काहीच उपयोग झाला नाही .शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे जर विकलेल्या शेतमालाचे पैसे मिळाले नाही तर शेतकऱ्यानी आपला उदारनिर्वाह कसा चालवावा? तरी आता सणासुदीचे दिवस लागले असुन अशात पैस्याची अत्यंत गरज लागते तरी शासनाने तुरीचा मोबदला रक्कम त्वरीत देण्याच्या मागणी करीता मुडगाव येथील शेतकरी विलास बहादुरे यांनी दि०९सप्टेबर २०१८ पासुन अकोट तहसील वर उपोषणाला बसले होते उपोषण दुसऱ्या दिवसी तहसिलदार विश्वनाथ घुगे यांनी पधंरा दिवसात उरलेल्या शेतकऱ्याचे पैसे देण्याचे दिल्यामुळे विलास हिम्मतराव बहादुरे यांनी उपोषण मागे घेतले असुन त्यावेळी मुडगावचे उपसरंपच तुशार पाचपोर, देवांनद घुसे सह शेतकरी बाधंव उपस्थितीत होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola