हिवरखेड (सूरज चौबे) : राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगात पुज्यनीय मानले जातात. त्यांनी सत्य व अहिंसा याची शिकवण जगाला दिली. महात्मा गांधी हे स्वच्छतेचे दूत होते. तसेच लाल बहादूर शास्त्री यांनीही जय जवान जय किसान हा नारा देऊन देशातील सैनिकाला व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले, असे प्रतिपादन सहदेवराव भोपळे विद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती समारोहाप्रसंगी दादासाहेब भोपळे यांनी केले. या समारोहाच्या प्रमुख उपस्थिती महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सत्यदेवराव गिऱ्हे , पर्यवेक्षक राजेंद्र तायडे, रमेशचंद्र गिऱ्हे, एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोषकुमार राऊत हे होते.
या दिनाचे औचित्य साधून गावात स्वच्छता जनजागृती कृतियुक्त अभियानासाठी रॅली काढण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत, मंदीर-मज्जीद, माळीवैभव कार्यालय, बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनवाडी स्टॉप या परिसरासह हिवरखेड शहरातील मुख्य रस्त्यावर विद्यार्थ्यांनी व एनएसएस स्वयंसेवकांनी साफसफाई केली. या अभियानासाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका कु रंजना अंजनकर ,कु .रजनी वालोकार व कु छाया गिरी यांच्या मार्गदर्शनात कु ताथोड, कु. सुलभा येलुकार, गणेश खानझोडे, रंजित राठोड, प्रा.निलेश गिऱ्हे , अभिजित भोपळे, स्नेहल भोपळे, स्वप्नील गिऱ्हे , प्रा.गणेश भोपळे, निलेश कासोटे, यांच्यासह आदींनी सहकार्य केले. रॅलीचा समारोप भोपळे कॉलेज येथे झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांची यथोचित भाषणे झालीत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. जयश्री इंगळे व कु. प्रगती वानखडे तर आभारप्रदर्शन प्रांजली टाले यांनी केले.
अधिक वाचा : हिवरखेड ग्रामपंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम अनधिकृत- मनसेचा आरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola