आकोट (प्रतिनिधि)- दि.२९ सप्टेंबर रोजी आखील भारतीय आदिवासी विकास परीषद अकोला व आदिवासी समाजाच्या यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी ,व उपविभागीय दंडधिकारी आकोट यांना निवेदन सादर करुन मुंबई विद्यापीठ TYBA च्या पाठ्यपुस्ताकातील दिनकर मनवर या कवीने आदिवासी मुली विषयी अश्लील लिखाण केल्यामुळे या कविवर अँक्टॉसिटी अँक्ट महिला अपमान प्रतिबंध कायद्यानुसार या माथेफीरु कविवर अँक्टॉसिटी अँक्ट कायद्यानुसार गुन्हा नोदंवुन कायदेशिर कारवाई करावी करीता आज अकोट येथे निवेदन देण्यात आले .
मुंबई विद्यापीठ(TYBA) च्या पाठ्यपुस्ताकातील दिनकर मनवर या कवीने
(पाणी कस असत ) या कवितेत आदिवासी मुलीबद्यल अश्लील भाषेत लिखाण केले आहे. त्यामुळे समस्त आदिवासी समाजाचा अपमान असुन यामुळे समस्त आदिवासी च्या भावना दुःखवल्या आहेत तरी TYBA च्या अभ्यास क्रंमातुन सदर कविता रद्य करुन दोषीवर कठोर कारवाई करावी व आदिवासी समाजाला न्याय द्यावा करीता निवेदन देण्यातआले यावेळी अ. भा. आदिवासी विकास परीषद अकोला चे कार्यध्यक्ष ऊमेश पवार, दादाराव भास्कर, पाडुरंग तायडे, सुभाष सुरत्ने, अजाबराव भास्कर,सतोष सोळके, दिपराज भास्कर, श्रीकृष्ण सोळंके, अविनाश सुरत्ने, मनिष तायडे, कमल भास्कर, गजानन पालवे, तोताराम गवते, रमेश केदार, रवि तायडे, अभिषेक पालवे,सह शेकडो आदिवासी बाधंव ऊपस्थित होते.
माथेफीरू कवी दिनकर मनवर याला तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करुन कठोर कारवाई करावी कारवाई न झाल्यास आदिवासी समाजाच्या वतिने मोठे आंदोलन उभारू व विकृत कवीला आदिवासी स्टाईल ने धडा शिकवला जाईल. – उमेश पवार कार्यध्यक्ष अ. भा. आदिवासी विकास परीषद ,अकोला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola