आकोट (सारंग कराळे)- तालुक्यातील नाफेडच्या खरेदीच्या प्रक्रियेवरुन अनेकदा तारखेत बदल करण्यात आल्यानतंर आकोट शहरातील विविध राजकीय पक्ष सघंटनानी वेगवगळया स्वरुंपाचे आंदोलन छेडल्यानतंर अखेर आज कुर्षी उत्पन्न बाजार समिती आकोट येथे आज दि.२९ सप्टेंबर रोजी डिजिटल पेरेपत्रकाचा प्रमाणे नाफेड नोंदणीस सुरुवात करण्यात आली होती परंतु नाफेडच्या वतीने कुठल्याच प्रकराचे नियोजन नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्याची चागंलीच तारांबळ उडालेली दिसली अखेर शिवसेनेच्या मध्यस्थीने डिजिटल पेरेपत्रकाचा प्रश्न सुटून नाफेड नोंदणीस सुरुवात विदर्भ कोर्पोरेशन च्या अधिकारी वाघ यांच्या लेखी आश्वासना नुसार आज नोदणी सुरू करताना सरकारच्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांचे डिजिटल पेरेपत्रक असेल त्याचीच नोंदणी करन्यात येइल असे vcms चे अधिकारी यांनी संगितल्याने ज्या शेतकऱ्यांकडे हस्तलिखित पेरेपत्रक होते त्यांच्या मोठा प्रश्न उभा राहिला होता. अशावेळी मा. आ. संजय गावंडे यानी जिल्हाअधिकारी, तहसीलदार श्री घुगे यांच्याशी चर्चा केली तसेच vcms च्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी तसेच सहाय्यक निभंदक श्री मालवे यांच्याशी चर्चा करून आज हस्तलिखित पेरेप्रत्रकावर नोंदणी करन्याची तजवीज केली. त्यानुसार नायबतहसीलदार गुरव ,vcms चे भूईभार कृ. उ बा समितीचे मालवे साहेब,संजय तळोकार यानी आज नोंदणी सुरु केली.नोंदणी सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मा.आ संजय गावंडे ,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मुकेश निचळ ,गोपाल म्हैसने ,विक्रम जायले,मोहनराव गावंडे ,रोशन पर्वतकार ,बंजरंग गोतमारे,गोपाल कावरे,दिनकर राऊत,अतुल पांडे कार्तिक गावंडे,प्रमोद गावंडे,अंकुर गावंडे तसेच असंख्य शेतकरी हजर होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola