अकोला (शब्बीर खान) : अकोला शहरातील रहिवासी व काही महिन्यापुर्वीच लग्ण झालेल्या एका नवदाम्पत्यामध्ये अशोक वाटीका चौकामध्ये भर रस्त्यावर हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
पती-पत्नीत हाणामारी सुरु असल्याचे नागरिकांना दिसताच चौकात एकच गर्दी झाली होती. हा प्रकार सिटी कोतवाली पोलिसांना दिसताच त्यांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले. शहरातील रहिवासी एका दाम्पत्यामध्ये दोघांमध्ये लग्णानंतर काही दिवसातच वाद सुरु झाले. या वादात दोघांनीही सोबत न राहण्यासाठी एकमेकांविरुध्द महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार केली आहे.
या दोघांचा खटला सदर ठिकाणी सुरु असतांनाच त्यांनी पोलिस अधीक्षकांकडेही धाव घेतली. मात्र त्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटले नाहीत. अशातच शुक्रवारी रात्री पती पत्नी रामलता बिझनेस सेंटरजवळ एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यातील वादाला पुन्हा तोंड फुटले. या ठिकाणावर कीरकोळ वाद झाल्यानंतर दोघेही अशोक वाटीका चौकात आले.
अशोक वाटीका चौकात वाद वाढल्याने पती-पत्नीमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार नागरिकांसह सिटी कोतवाली पोलिसांना दिसताच त्यांनी तातडीने धाव घेउन दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीला तिच्या मोठ्या वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. तर मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
अधिक वाचा : पातूर येथे बीसीच्या वादातून दोन गटांमध्ये झाली हाणामारी; ३ गंभीर, एक जखमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola