अकोला(शब्बीर खान) : लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहमतीने सन २०१५ पासून ते २०१८ या कालावधीमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात अकोला जिल्हा परिषदेसमोर देवेश पातोडे व त्यांचे सहकारी शेरु पठाण यांनी २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पारस ग्रामपंचायतने केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध ७ वेळेस चौकशी करण्याचे आदेश बाळापुर पं.स. अधिकारी यांना देवुनही कारवाई होत नसल्यामुळे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाNयांनी ४ मे २०१८ रोजी तक्रारकत्र्यांनाच काळ्या यादीत टाकण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आणि लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याने देवेश पातोडे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. देवेश पातोडे यांनी पारस ग्रा.पं.विरुद्ध तात्काळ कारवाई करण्यासाठी ४ सप्टेंबर २०१८ रोजी सरकारच्या पोर्टलवर भारताचे पंंतप्रधान यांना व आपले सरकार या ऑनलाईन वेबसाईटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ऑनलाईन तक्रार दिली. त्या तक्रारीची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आणि जि.प.पंचायत विभागामार्फत बाळापुर गटविकास अधिकारी यांना ५ सप्टेंबर २०१८ रोजी कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले; मात्र त्यानंतर बारा दिवस उलटून गेले तरी कारवाई न झाल्याने देवेश पातोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात १७ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत त्यांनीसुद्धा बाळापुर पंचायत समितीकडे पारस ग्रा.पं.वर चौकशीची कारवाई व्हावी म्हणून सदर प्रकरण वर्ग केले.
पण बाळापूर पंचायत समितीतील अधिकारी हे वरिष्ठ अधिकारयाच्या अभयामुळे कारवाई करीत नसल्याचे देवेश पातोडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी व त्यांचे सहकारी शेरु पठान यांनी ग्रा.पं.विरुद्ध भ्रष्टाचाराच्या सबळ पुराव्याच्या आधारे २४ सप्टेंबर २०१८ पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज आमरण उपोषणास तीन दिवस झाले तरीही कारवाई होताना दिसत नाही, यासंदर्भात उपोषण कर्ते व पारस गावातील विकास कामाची आशा लावून बसलेल्या नागरिकांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्रशासन हे हेतुपरस्पर हलगर्जीपणा करीत असून, भ्रष्ट लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपोषणकत्र्यांनी केला आहे. देवेश पातोडे यांनी पारस ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधीकारी शेख चांद उस्मान कुरेशी व पारसचे सरपंच पती ग्रा.पं. सदस्य सुरेंन्द्र शंकर खंडारे यांनी सरपंचाच्यावतीने पारस ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात सन २०१५ पासुन ते २०१८ पर्यतच्या देवेश पातोडे व त्यांचे वडील सुपोत पातोडे यांनी केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांना दोन लाख रुपयाचे आमिष दिले होते. याबाबत देवेश पातोडे यांनी ०७ फेब्रुवारी २०१८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथे या दोघांविरुद्ध लिखीत तक्रार दिली. त्यावर पारस येथील महिला सरपंच कविता सुरेंन्द्र खंडारे व त्यांचे पती सुरेंन्द्र खंडारे आणि ग्रामविकास अधिकारी सी.यु.कुरेशी यांना तक्रीरीची भनक लागल्याने त्यांनी यांच्या पोलीस स्टेशनला देवेश पातोडे व त्यांचे वडील सुपोत पातोडे यांच्या विरोधात पैसे मागत असल्याचा आरोप करीत तक्रारी दिल्यात. त्यावर कारवाई नाही झाली म्हणून न्यायालयाच्या १५६/३ च्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याचे बाळापुर पो.स्टे.ला आदेश आणले आणि २९ जुन रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.त्यावर पोलिसांनी तपास सूत्रे हलविली.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांना सदर देवेश पातोडे यांनी दिलेल्या तक्रारी बाबत खुलासा आणि त्यांच्या कार्यालयाचा अहवाल मागितला. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले यांनी बाळापुर पो.स्टे.ला अहवाल दिला. त्या अहवालानुसार देवेश पातोडे यांच्या केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पारस ग्रा.प.सरपंच पती तथा ग्रा.प.सदस्य सुरेंन्द्र खंडारे व ग्रामविकास अधिकारी सी.यु.कुरेशी हे दोघेही आमच्या अहवालानुसार दोषी असल्याचे स्पष्ट होते, असे त्या अहवालात नमूद आहे. हे सिद्ध झाल्यामुळे व पारस गावातील भ्रष्टाचार हा जनतेसमोर यावा म्हणुन देवेश पातोडे हे त्यांच्या सहकाऱ्यासोबत पारस ग्रामपंचायत प्रकरणी भ्रष्ट व दोषी विरुद्ध कारवाई व्हावी याकरिता उपोषणास बसलेले आहेत. उपोषणा दरम्यान देवेश पातोडे यांची दुसऱ्याच दिवशी प्रकृती बिघडल्यामुळे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांनी देवेश पातोडे यांची भेट घेवुन त्यांना आम्ही काही दिवसात कारवाई करतो, तुम्ही उपोषण मागे घ्या व त्याबाबत आम्ही लेखी कळवतो असे म्हटले. त्यावर देवेश पातोडे यांनी कुळकर्णी यांना पारस ग्रामपंचायतची तात्काळ चौकशी करुन दोषी सरपंच, सचिव व त्यांना साथ देणारया वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी समिती नेमावी आणि चौकशी जोपर्यत पारस गावात सुरु होणार नाही तोपर्यत मी व माझे सहकारी आमरण उपोषण मागे घेणार नाही असे सांगितले.
देवेश पातोडे यांनी ४ सप्टेंबर रोजी सरकारच्या या ऑनलाईन वेबसाईट वर केलेल्या तक्रारीची शासनाने दखल घेवुन २५ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी मदन सोंडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.त्या आदेशाचे पालन जिल्हा परिषद करणार विंâवा कसे व पारस ग्रामपंचायच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सुरु असलेल्या आमरण उपोषणादरम्यान काय कारवाई होते याकडे पारस गावातील व अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola