मुंबई – औषधांची ऑनलाईन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’ (एआयओसीडी) या देशभरातील औषध विक्रेते आणि वितरकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने आज बंदची हाक दिली आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात निषेध करण्यासाठी देशातील सर्व औषधविक्रेत्यांनी आज एक दिवसाचा बंद पुकारला आहे. भारतात ई-फार्मसीला कोणत्याही स्वरुपात परवानगी देण्यालाही या विक्रेत्यांचा विरोध आहे. औषधांची ऑनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होऊ शकतो. यातून आपल्या देशाच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण पिढीचे कधीच भरुन न येणारे नुकसान होऊ शकते, असे मत एआयओसीडीने व्यक्त केले आहे.
निवेदन पत्रिकांच्या माध्यमातून केंद्र सरकार, संबंधित मंत्री आणि विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन यांना वारंवार आवाहन करण्यात आले होते. ई-फार्मसी, पोर्टल्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीबाबत अनेक प्रकरणे दाखल आहेत, असे एआयओसीडीने सांगितले. भारतातील सर्व औषधविक्रेत्यांनी या समस्येच्या गांभीर्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी २ वेळा एकदिवसीय बंद केला आणि ८ तास काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन कंपन्या या प्रयत्नानंतरही सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करत असताना अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचे दिसत नसल्याचा दावा एआयओसीडीने केला आहे. मुंबईत ६ हजार ५००, राज्यात ६० हजार, तर भारतात एकूण ८ लाख ५० हजार औषध विक्रेते आहेत. राज्यात या संप काळात औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने वांद्रे येथील मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola