अकोला (शब्बीर खान ) : अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने बहुचर्चित किशोर खत्री हत्याकांडातील रणजितसिंह चुंगडे आणि जसवंतसिंह उर्फ जस्सी आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात आणि कलम 120 ब कट रचून खून करणे अंतर्गत दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा,50 हजार रुपये दंड आणि 40 हजार मृताकाच्या पत्नीला 40 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस .जाधव यांनी दिला.
परंतु आरोपींकडे शस्त्र होते हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही. खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली असल्याने,अकोला जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेचे या खून खटल्यातील निकालाकडे लक्ष होते.सत्र न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश ए. एस .जाधव यांनी आरोपींना आपली बाजू मांडण्याची संधी दिली,त्यावेळी आरोपींना घरी कोण कोण आहेत,हे विचारून याप्रकानातील मुख्य आरोपी रणजित चुंगडे यांना त्यांचे वय किती आहे याची सुद्धा विचारणा केली.
सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली तर बचाव पक्षाचे वकील दिलदार खान यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा करून सुधारण्याची संधी द्यावी असे न्यायालायसमोर सांगितले. प्राप्त माहितीनुसार जुने शहरातील सोमठाणा शेतशिवारात ३ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी बांधकाम व्यावसायिक किशोर खत्री यांचा खून झाला होता. याप्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक रियाज शेख व पोलिस उपनिरीक्षक संतोष केदासे यांनी दिलीप खत्री यांच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करून तपास केला.
या तपासात पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, पोलिस कर्मचारी जसवंतसिंग उर्फ जस्सी, रुपेश चंदेल, राजीव मेहरे यांना अटक केली होती. या प्रकरणात रूपेश चंदेल व राजीव मेहरे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता,तर रणजितसिंह चुंगडे व जस्सी यांचा जामीन अर्ज रद्द करून कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.घटनेच्या दिवसापासून रणजितसिंग चुंगडे आणि जसवंत सिंग उर्फ जस्सी कारागृहातच होते.द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम,जिल्हा सरकारी वकील ॲड. राजेश्वर देशपांडे यांनी २१ साक्षीदार तपासले.आरोपींची बाजू अमरावतीचे ॲड. वसीम मिर्जा, ॲड. दिलदार खान, ॲड. श्री.हातेकर हे न्यायालयात मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकूण 27 सप्टेंबर 2018 रोजी खून करण्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
अधिक वाचा : मंदुरा हत्या प्रकरणातील आरोपीना अटक करा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola