कौन बनेगा करोडपती 10 ला या सीजनचा पहिला करोडपती मिळाला आहे. चॅनेलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ जारी करुन याची घोषणा केली आहे. सीजनच्या पहिल्या करोडपतीचे नाव बिनीता जैन आहे. या गुवाहाटी, आसाम येथील आहेत. या व्हिडिओमध्ये बिनीताला एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देताना दाखवण्यात आले. परंतु त्या 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात की, नाही हे अजुन सस्पेंस आहे.
2 अक्टोबरला येणार एपिसोड:
चॅनलने व्हिडिओ जारी करत लिहिले की, ज्ञानाच्या या दहाव्या अध्यायामध्ये आम्हाला पहिली करोडपती मिळाली. आता ती पुढेही पैसे जिंकू शकेल का? हे जाणुन घेण्यासाठी पाहत राहा केबीसीचा सप्तकोटी एपिसोड, 2 अक्टोबर रात्री 9 वाजता, अमिताभ बच्चनसोबत.
Gyaan ke iss duswe adhyaay mein mil gayin hai humein peheli Crorepati. Par kya uss se bhi aage jeet paayengi Binita ji? Dekhiye #KBC ka Sapt Koti Episode, 2 October ko raat 9 baje, @SrBachchan ke saath. pic.twitter.com/X0qg3cJnCE
— Sony TV (@SonyTV) September 27, 2018
12 आठवडे चालणार शो :
या वेळी प्रोग्रामची टॅग लाइन ‘कब तर रोकोगे’ अशी आहे. फॉर्मेटमध्ये काही खास बदल करण्यात आलेले नाही. काही नवीन फीचर अवश्य जोडण्यात आलेले आहेत. हा सीजन एकुण 12 आठवडे प्रसारित होईल. म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत एपिसोड चालतील. या शोची प्रसारणाची वेळ 9 वाजता आहे. तुम्ही हा कार्यक्रम Sony LIV app वरही पाहू शकता.
अधिक वाचा : तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola