अकोट (शब्बीर खान) : अकोट शहरातील जेष्ठ नागरिकांची सुरक्षा व त्यांना कायदेशीर मदत करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले,जेष्ठ नागरिकांच्या मासिक सभे मध्ये ते बोलत होते.
ह्या सभे मध्ये उपस्थित जेष्ठ नागरिकांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या, विना वाहक एसटी बस मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असावी, तसेच जेष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागेवर जेष्ठ नागरिकांशिवाय कोणालाही बसू देऊ नये सदर सीट जेष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, जेष्ठ नागरिक संघ साठी त्यांच्या कार्यलयासाठी एखादा हॉल नगर पालिकेने उपलब्ध करून द्यावे, ज्या जेष्ठ नागरिकांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला असेल त्याला विशेष शासकीय मदत सरकारने करावी, वाहनांच्या कर्कश हॉर्न वर कारवाई करावी अश्या काही मागण्या जेष्ठ नागरिकांनी केल्या.
त्यावर संबधीत विभागाला कळविण्यात येईल असे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी त्यांना आश्वाशीत केले, तसेच आगामी 1 ऑक्टोम्बर जागतिक जेष्ठ नागरिक दीना निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमा बाबत चर्चा करण्यात आली, शहरात राहणाऱ्या एकाकी जेष्ठ नागरिकांची माहिती काढावी जेणे करून त्यांना उचित मदत करता येईल असे ठरले सदर सभेला शहरातील जेष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे अकोट शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांसाठी अल्पोहर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola