आमदार बच्चू कडू आयएएस अधिकारी यांच्यात बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. महापरीक्षा पोर्टलवरून नोकर भरतीबाबत सुरू असलेल्या वादा संदर्भात चर्चा करण्यासाठी कडू कार्यकर्त्यांसह माहिती संचालक प्रदीप पी. यांच्या कार्यालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचे कळते. यावेळी बच्चू कडू टेबलवरील लॅपटॉप उचलून थेट प्रदीप यांच्यावर धावून गेले. मात्र कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी शनिवारी मुख्यमंत्री आणि अधिका-यांना पत्र लिहिले होते. त्यावर काय कार्यवाही झाली, याची विचारणा करण्यासाठी ते प्रदीप यांच्या कार्यालयात बच्चू कडू गेले होते. तेव्हा त्यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संतापलेल्या बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी गोंधळ घातला.
महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी
महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. महापरीक्षा हे पोर्टल स्पर्धा परीक्षांचे ढिसाळ नियोजन करुन, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
अधिक वाचा : सावित्रीबाई फुले विद्यालय पातुरच्या मुलांनी दिला स्वच्छतेचा संदेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola