दानापूर (सुनीलकुमार धुरडे) : संग्रामूपर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या अारोपीला तातडीने कठोर शिक्षा करावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावून द्यावा, अशी मागणी शुक्रवारी (ता.१४) अखिल भारतीय बारी महासंघातर्फे करण्यात अाली. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची समाजातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन निवेदन दिले.
वानखेड (जि.बुलडाणा) येथे शनिवारी (ता.८) प्रकाश लोणे या नराधमाने शेजारी राहणाऱ्या १८ वर्षीय गतिमंद मुलीसोबत घरी कुणीही नसल्याची संधी साधत अत्याचार करण्यात आला. संबंधित मुलीचे अाई-वडील शेतमजुरीला गेलेले असताना हा नराधम रॉकेल मागण्याच्या बहाण्याने घरात घुसला. त्याने मुलीवर अत्याचार केल्यानंतर याची कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. अाईवडील घरी अाल्यानंतर घाबरलेल्या मुलीबाबत त्यांना प्रकार समजला. भितीपोटी त्यांनी घटनेच्या दिवशी तक्रार दिली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिस ठाणे गाठत प्रकाश लोणे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्याच रात्री पोलिसांनी अारोपीला अटकही केली. हे प्रकरण प्रत्येक समाजासाठी लांच्छनास्पद असून अारोपींवर जरब बसविण्यासाठी तातडीने कठोर शिक्षा होण्याची मागणी डॉ. पाटील यांच्याकडे करण्यात अाली.
यावेळी अखिल भारतीय बारी महासंघाचे संस्थापक रमेशचंद्र घोलप, अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव रौंदळे, राजू पाटील, अमोल ढगे, नारायण ढगे, सुभाषराव हागे, श्याम डाबरे, वरवट बकाल सरपंच श्रीकृष्ण दातार, संतोष टाकळकार, वासुदेव रौंदळे, अशोक टाकळकर, यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी चर्चेत समाज बांधवांना अाश्वस्त करीत दोषीला कठोर शिक्षा मिळावी. यासाठी शासनच स्वतः पुढाकार घेईल. या प्रकरणाच्या तपासात कुठेही पोलिसांकडून ढिलाई होणार नाही, याबाबत बुलडाणा जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच संबंधित तामगाव ठाण्याच्या ठाणेदारासोबत स्वतः बोलून निर्देश देणार असल्याचे सांगितले. एकदा या प्रकरणाचा तपास पुर्ण होऊन केस फाइल झाली की त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी जलदगती न्यायालय, चांगला वकील देण्यासाठी अापण स्वतः शासनाककडे पाठपुरावा करू, असेही डॉ. पाटील म्हणाले.
अधिक वाचा : अकोटातील बोगस डॉक्टर प्रकरणातील डॉ गांधी पोलिसांना शरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola