मूर्तीजापुर ( प्रकाश श्रीवास ): सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. तो विनाकारण कोणालाही इजा पोहचवत नाही. जोपर्यंत माणसाचा धक्का लागत नाही तो पर्यंत तो स्वतःताचा जिव कसा वाचविता येईल यासाठी प्रयत्न करीत असतो. जाणीवपूर्वक माणूस त्याची छेडछाड करीत असेल तो माणसाला चावा घेतल्याशिवाय सोडत नाही. काही सर्प हे बिन विषारी तर काही जहाल विषारी असतात. सर्प चावल्यास माणूस अर्धा मेल्यासारखा होवुन जातो.तरी सर्प हा आपला मित्र आहे असे समजून आपल्या घरात सर्प निघाल्यास सर्पमित्रांना पाचारण करून त्याचे जिव वाचवण्यासाठी प्रयत्न करून पुण्य कमवा असे आव्हान सर्पमित्र मुन्ना श्रीवास आणि बाबासाहेब धाबेकर विधालय कुरूमचे जमालोददीन शेख यांनी माहीती देतांना सांगितले आहे.
मूर्तीजापुर तालुक्यातील माना येथील ईकलाँस राणात एक दहा फुटाचा अजगर साप असल्याची माहिती माना येथील खंडारे नामक इसमाने सर्पमित्र मुन्ना श्रीवास व जमालोददीन शेख शिक्षक बाबासाहेब धाबेकर विदयालय कुरूम याना दिल्यावरून दोन्ही सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना खरोखरच दहा फुटाच बिनविषारी अजगर साप दिसून आला त्यांनी लगेच त्याला पकडून मूर्तीजापुर येथील विश्रामगृह नं २ येथे आणले.व आमदार हरीष पिंपळे यांच्या प्रयत्नात त्या अजगराला वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे,जि.डी.इंगळे वनपाल,आर.आर.लोखंडे यांच्या स्वाधीन करून त्याला काटेपुरणा अभयारण्यात सोडून देवुन त्याला जिवनदान दिले आहे. सदर अजगर दहा किलो वजनी होता.त्याने कोणत्याही प्रकारच्या प्राणी अथवा माणसाला आजरोजी गिळल्यास त्याला एक महीना भुक लागत नाही. अजगर बिनविषारी असतो त्याने माणसाला चावा घेतल्यास काहीही घाबरण्याचे कारण नाही. आपल्या घरात सर्पनिघाल्यास तात्काळ आपल्या जवळील सर्पमित्रांना पाचारण करून त्याला जिवनदान दया.सर्प कोणत्याही प्रकारचा असो त्याला मारू नका तो ही आपल्या सारखा एक माणूस आहे. त्याचे जिव वाचवून पुण्य कार्याला योगदान देण्याचे आव्हान सर्पमित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास आणि बाबासाहेब धाबेकर विदयालय कुरूमचे शिक्षक जमालोददीन शेख यांनी माहिती देतांना सांगितले आहे. यावेळी आमदार हरीष पिंपळे,नगरसेवक सचिन देशमुख, राजु सदार,संदीप जळमकर, समाजसेवक कमलाकर गावंडे, पोलिस उपनिरीक्षक राजु जोशी, रोहित अग्रवाल, रोहित श्रीवास, सतिष बडोदे, आदीची उपस्थितीती होती.
अधिक वाचा : मुर्तिजापूर जवळ ऑटो पलटी,१४ शेतमजूर बालबाल बचावले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola