पुणे – एसटीच्या वाहक-चालकांना सध्या दहशतीच्या वातावरणात काम करावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकाराची एसटी महामंडळ आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. क्षुल्लक कारणावरुन या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. या मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईचा इशारा महामंडळाने दिला आहे.
यासंदर्भातील खटले तातडीने निकाली निघावेत, यासाठी या कामगारांना महामंडळाच्या खर्चाने वकील देण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या वतीने पॅनेलवर वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे एसटी कामगारांना दिलासा मिळणार आहे. क्षुल्लक कारणावरुन एसटी वाहक आणि चालकांना मारहाण करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ते ड्युटीवर असतानाही महामंडळाच्या वतीने त्यांना यापूर्वी संरक्षण देण्यात येत असले, तरी ते काहीसे तोडके असेच होते. आता त्यांना अधिक संरक्षण देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न सुरु केले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यादृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
वाहक आणि चालकांना कामावर असताना मारहाण केल्यास संबंधितावर कायदेशीर कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, हे खटले चालविण्यासाठी त्यांना प्रसंगी स्वत:च वकील द्यावा लागत होता. आता यापुढे या कामगारांना हे खटले चालविण्यासाठी महामंडळातर्फे वकील देण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणात पॅनेलवरील वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबत महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांशी यापूर्वीच चर्चा करण्यात आली आहे. त्यांना त्यासंबधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय यापुढील काळात अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात याव्यात, यासाठी संबधितांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.- दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र.
अधिक वाचा : राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ” शाॅक”
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola