अकोला (प्रतिनिधी): वाढदिवस हा तसा आयुष्यातील एक वर्ष कमी झाल्याची जाणीव करून देणारा दिवस! समाजाभिमुख लोक वाढदिवस सामाजीक कार्यांनी किंवा संकल्पांनी साजरा करतात.काल शेतकऱ्यांचा सण असलेल्या पोळ्याच्या दिवशी बाळापूर तालुक्यातील बहादूऱ्याचे माजी सरपंच विठ्ठल पाटील माळी यांनी आपला वाढदिवस असाच आगळ्या पद्धतीने साजरा केला.प्रेरणा होती “युवाराष्ट्र”च्या बळीराजा संवेदना अभियान ची.या अभियान अंतर्गत “युवाराष्ट्र” गेल्या अनेक महिन्यांपासून कापसावरील गुलाबी बोन्ड अळी च्या निर्मूलनासाठी भरीव व धडक जनजागृती मोहीम राबवीत आहे.या वर्षी आतापर्यंत कापसावरील गुलाबी बोन्ड अळी चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर नियंत्रीत आहे या मध्ये “युवाराष्ट्र”च्या प्रयासांचा नक्कीच सिंहाचा वाटा म्हणता येईल.असे असले तरी सप्टेंबर महिन्यापासून खऱ्या अर्थाने बोन्ड अळी च्या नियंत्रणासाठी जागरूक असणे गरजेचे आहे.आहे ते बीज तंत्रज्ञान आणखी काही वर्षे टिकवण्यासाठी व कापसाचे पीक घेण्यासाठी चालू हंगामात गुलाबी बोन्ड अळी पूर्णपणे नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.”युवाराष्ट्र”च्या बळीराजा प्रतीच्या संवेदनशील कार्याने प्रेरित होऊन बहादूऱ्याचे माजी सरपंच,प्रगतिशील शेतकरी व कृषिपुरक उद्योगांसह लोकहिताचे अनेक कल्पक उपक्रम आपल्या गावामध्ये राबविण्यासाठी धडपडणारे युवा शेतकरी नेतृत्व यांनी आपला वाढदिवस बोन्ड अळी च्या निर्मूलन कार्यासाठी साजरा केला.
सदर कार्यक्रमात कापसावरील गुलाबी बोन्ड अळी निर्मूलनाबाबत जनजागृती सोबतच विठ्ठल पाटील माळी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील 40 गरजू शेतकऱ्यांना स्वखर्चाने प्रत्येकी 3 कामगंध सापळे उपलब्ध करून दिले.सदर कार्यक्रमासाठी “युवाराष्ट्र”चे डॉ निलेश पाटील,विलास ताथोड व बाळापूर तालुक्यातील युवा शेतकरी नेतृत्व दीपक पोहरे यांनी मार्गदर्शन केले.”युवाराष्ट्र” चे डॉ निलेश पाटील व विलास ताथोड यांनी डॉ पं. दे.कृ. वि.अकोला येथे दि.11 मार्च 2018 रोजी पार पडलेल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या राज्यस्तरीय गुलाबी बोन्ड अळी व्यवस्थापन कार्यशाळेला पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रशिक्षण प्राप्त करून घेतले होते व त्यापूर्वी पासूनच गुलाबी बोन्ड अळी बाबत व कापूस तंत्रज्ञान बाबत जनजागृती चे विविध उपक्रमात युवाराष्ट्र चा पुढाकार राहिला आहे.विठ्ठल माळी यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमात गुलाबी बोन्ड अळी सह शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मार्गदर्शन व सहकार्य करीता “युवाराष्ट्र”सदैव तत्पर असल्याचे डॉ निलेश पाटील व विलास ताथोड यांनी सांगितले “युवाराष्ट्र”चा बळीराजा संवेदना रथ पुढील काही दिवस बाळापूर तालुक्यातील गावागावांत जनजागृती करणार असून तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन “युवाराष्ट्र” तर्फे करण्यात आले आहे.