अडगाव बु(गणेश बुटे): शिवाजी नगर व अडगाव बु. येथे बैल पोळा मोठ्या उत्साहाने शांततेत पार पडला. या वेळी सर्व शेतकरी बांधव आपपले बैल पोळ्यामध्ये बैलांना रंगी बेरंगी सजावट करुण तोरण पोळ्या खाली आणुन आनंदमय वातावण करुण बैलांना मोठ्या शिस्तीने पोळा भरववुण शांतता राखली.यावेळी सर्व प्रथम मानाचे बैल यांच्या बैल जोडीचे पुजन करुण पी.एस.आय.माळी साहेब यांनी बैल जोडी मालक रविद्र निमकडेॅ यांना शाल देवुण त्यांचा सत्कार केला.तसेच वर्षानुवर्ष पोळा भरविण्यासाठी तोरण बांधुण लाउस्पीकर यांची व्यवस्था करुण मोलाचे सहकार्य नेहमी जोपासणारे नारायणरावजी भड यांना शाल देउण अडगाव पञकार संघ सदस्य अनिल वगारे यांनी सत्कार केला. तसेच तक्टामुक्ती अध्यक्ष श्रीकृष्ण निमकडेॅ, विठ्ठल बागडी, गणेश बुटे, दिपक रेळे, पुरुषोत्तम निमकडेॅ, गोपाल चांडक, राजु भड, अशोक तुंबळे, मनोहर राहाटे, अमोल बंड, वैभव बोदळे इत्यादी बहुसंखेने शेतकरी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
अधिक वाचा : पोळ्याच्या सणाला बैलाला आंघोळ घालतांना मुलगा धरणात बुडाला
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola









