अकोला : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्वाने प्रेरित होऊन, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाताने शिवबंध बांधून आज शुक्रवार दि.७ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिसन बाजोरीया यांच्या मार्गदर्शनात पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये ख्यातनाम व्यक्तीमत्व असलेले प्राचार्य डॉ. श्रीप्रभु चापके यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई येथील शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आ.बाजोरीया यांच्या सोबत डॉ.चापके यांनी भेट घेऊनशिवसेनेत प्रवेश घेण्याची मनिषा व्यक्त केली. शिक्षणक्षेत्रात नावलौकीक असलेले डॉचापके यांची मनिषा रास्त असून अशा व्यक्तीमत्वामुळे राजकारणाला अजून एक आयाम मिळणार,असे यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त करीत त्यांना शिवसेनेत प्रवेश देत, त्यांच्या हातावर शिवबंध बांधले.
शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिसन बाजोरीया आणि डॉ चापके यांच्यामध्ये गत काही महिन्यापासून सुरु असलेली चचां आज प्रत्यक्षात साकार झाला. अकोला जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने कार्य करुन, शिवसेनेने दाखविलेला विश्वास सार्थ करु असे, सदर प्रतिनिधीशी बोलतांना डॉ.चापके यांनी सांगितले.
शिवसेनेला डॉ.चापके यांच्या स्वरुपात एक शिलेदार मिळाला असून त्यांच्या संघटन कौशल्य आणि संपर्काचा निश्चित फायदा होईल असे आ.गोपिकिसन बाजोरीया यांनी सांगितले. यावेळी हिंगोली परभणी विधानपरिषद सदस्य आविप्लव बाजोरीया, शिवसेनेचे माजी जिल्ह्यप्रमुख विजय मालोकार व युवासेना जिल्ह्यप्रमुख विठ्ठल सरप पाटील उपस्थित होतेभाजपा शिक्षक आघाडीचे समन्वयक आणि सिनेट सदस्य व एल.आरटी. कॉमर्स कॉजेसचे प्राचार्य डॉ. चापके यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाला चांगला हादरा बसला असून डॉचापके यांच्यामुळे मोठ्या संख्येत प्राध्यापक आणि शिक्षकांचा ओढा शिवसेनेकडे वाढणार आहेयात शंका नाही.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola