अकोट(सारंग कराळे)- अकोट तालुक्यातील पोपटखेड शेत शिवारात दि.७/सप्टेंबर १८ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान डॉ अतुल दौड अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी अकोला,यांनी पोपटखेड येथे मुदत बाह्य पासवर अवैध मुरुम गौनखनिजांची वाहतुक करताना ४ मोठे टिपर पकडुन पुढिल कारवाई करीत अकोट गा्मिण पोलीस स्टेशन येथे आणले व मडंळ अधिकारी यांना पुढिल कारवाईचे आदेश दिले.
मडंळ अधिकारी यांनी कारवाई करीत १) ईस्माइल बेग वकर बेग वय २५ रा.पोपटखेड २) सतोंष गजानन चिटे वय२५ रा.चडींकापुर ३) अविनाश धर्मे वय२९ रा.अकोट ४) राहुल जयस्वाल वय २६ रा.पोपटखेड यांना टिपर क्र. १) एम.एच.३० ए.व्ही.१२६६ २) एम.एच.३०ए बी ३१६४ ३) एमएच.०४सी पी ९१०७ ४) एम एच.३०एबी ४८२८ नबंरचे ४ टिपर मुरुम गौनखनिजाचे अकोट गा्मिण पोलीस स्टेशन लावण्यात आले आहेत.
अकोला येथुन येऊन डॉ अतुल दौड खनिकर्म अधिकारी यांनी पोपटखेड येथे येऊन कारवाई केल्याने अकोट महसुल विभागात मुदतबाह्य गौनखनिजाची अवैध व वाहतुक असल़्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक वाचा : महीलाविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राम कदमाविरूध गुन्हे दाखल करा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola