अकोला (प्रतिनिधी) : भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी अकोला जिल्ह्याचे वतीने भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या महिला विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. एकीकडे देशात व राज्यात भाजपाची सत्ता आहे तर दुसरीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येते.
नुकतेच दहीहंडी उत्सवा मधे भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवा मधे येणाऱ्या मुलींना उद्देशून घृणास्पद वक्तव्य केले या वक्तव्याचा भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्याच्या वतीने निषेधार्थ नारे लावुन निषेध करण्यात आला तसेच त्यांना निलंबित करून भाजपा ने राज्याची तसेच देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
महिला आघाडी जिल्हा महासचिव शोभाताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात जि प अध्यक्ष संध्याताई वाघोडे, रंजनाताई गेडाम, प्रतिभाताई अवचार, अनघाताई ठाकरे, कोकिळाताई वाहुरवाघ, किरणताई बोराखडे, वंदनाताई वासनिक, सुवर्णाताई जाधव, संगिताताई खंडारे, संगिताताई झोपे, मनीषाताई राऊत, विद्याताई अंभोरे, सुनीताताई गजघाटे, तसेच जिल्हाध्यक्ष प्रदिपभाउ वानखडे, महासचिव दिपक गवई, ज्ञानेश्वर सुलताने, संघटक बळीराम चिकटे, प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई, महानगर पश्चिम अध्यक्ष सिमांत तायडे, महानगर पूर्व अध्यक्ष शंकरराव ईंगळे, जिल्हा सचिव दिनकरराव नागे , श्रीकांत ढगेकर, , जेष्ठ नेता अशोकराव शिरसाट, बुद्धरत्न ईंगोले, महादेव शिरसाट, मनोहर शेळके,विलासराव जगताप, दिपक बोडखे, सम्राट तायडे, किशोर तेलगोटॆ, देवानंद खाडे, राजेश तायडे, विलास गवई, सुरेंद्र खंडारे, अरुण कचाले, पि डि सावंत, सुनील शिराळे यांची उपस्थिती होती असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी कळविले.
अधिक वाचा : भाजप शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीप्रभू चाफाके यांचा भाजप ला राम राम शिवसेनेत केला प्रवेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola