तेल्हारा (शुभम सोनटक्के) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ सप्टेंबर रोजी मुग खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे माजी सभापती तथा विघमान संचालक संदीप खारोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुग विक्रीधारक शेतकरी गणेश श्यामस्कार, विलास बोदडे, विलास मानकर यांचा शेला, दुपट्टा, टोपी, नारळ देऊन संदीप खारोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन मुगाला ४,७५१ रुपये भाव देण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक रविंद्र, माजी उपसभापती रामकृष्ण नागोलकार तसेच माधव बरिंगे, ज्ञानेश्वर मार्के या शेतकऱ्यासह व्यापारी गोविंद फाफट, गोपाल मुरारका, हरीष तापडिया, राजू केला, नवल लोहिया, संजय टावरी, महेश खरोडे, ओंकारआप्पा यांच्यासह बहूसंख्य शेतकरयाची उपस्थिती होती.
यामुळे होती बंद खरेदी
शासनाने हमीभावापेक्षा कमी दराने शेतकरयांचा माल खरेदी केल्यास संबधित व्यापाऱ्याविरुद्ध कारवाईचा निर्णय घेतला. त्यामुळे तेल्हारा येथील बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी खरेदी बंदचे हत्यार उपसले होते व खरेदी बंद केली होती. बाजार समितीचे सभापती सुरेश तराळे यांनी व्यापाऱ्यांसोबत ३ सप्टेंबर रोजी सभा आयोजित करून सभेमध्ये पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे १ सप्टेंबरचे परिपत्रक वाचून दाखविले . याबाबत यशस्वी शिष्टाई सभापती सुरेश तराळे यांनी केली व त्यावर व्यापाऱ्यांनी खरेदी बंदचे दिलेले पत्र त्यावर खरेदी सुरु करणार असल्याचे सभेमध्ये आश्वासन दिले. त्यामुळे बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी मंगळवारपासून सुरु करण्यात आली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola









