अकोट (सारंग कराळे) : अकोट शहरात ३ सप्टेंबर रोजी भव्य कावड मिरवणूक२४ मडंळे सहभागी होणार असुन कावडधारी शिवभक्त पूर्णा नदीवरून देवरी फाटा मार्गाने अकोट शहरात दाखल होतात.अकोला मार्गाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी हा मार्ग खोदलेला आहे.कावडधारी शिवभक्ताची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अकोट गा्मिण पोलीसानी विशेष व्यवंस्थेसह तगंडा बदोबस्त तैनात राहणार आहे.
दरम्यान शिवाजी चौक ते अकोला नाका रोड वर कावड मिरवणूक असल्याने सकाळी ७ ते १२वाजे पर्यंत सर्व प्रकारची भारी वाहना साठी सदर रोड बंद ठेवण्यात आला असून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी अकोट डेपो मॅनेजर लोणकर ह्यांना दिलेल्या पत्राला अनुसरून इतर बस डेपो मधून येणाऱ्या बसेस सुद्धा ७ ते १२वाजे पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत अकोला जाणाऱ्या बसेस हिवरखेड तेल्हारा अडसूळ फाटा , निंबा मार्गे जाऊ येऊ शकतात तसेच अंजनगाव कडे जाणाऱ्या येणाऱ्या बसेस लाक्कडगंज, हिवरखेड रोड मार्गे अंजनगाव रोड कडे जाऊ येऊ शकतात.
सकाळी ७ ते १२ वाजे पर्यंत शिवाजी चौक ते अकोला नाका पर्यंत कोणत्याही चार चाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. अकोट शहरातील कावड उत्संवा दरम्यान अकोट शहरातून ३१ गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती दिवसा साठी हद्दपार, करण्यात आले असुन अकोट शहराची संवेदनशीलता पाहता अकोट शहर पोलिसांनी चोख तयारी केली असून कावड उत्सवा दरम्यान शांतता राहावी म्हणून पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अकोट ह्यांचे आदेशाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एकूण ३१ व्यक्तींना अकोट शहरातून ३दिवसा साठी हद्दपार करण्यात आले असून कावड उत्सव दरम्यान एकूण ९८ व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अकोट शहरातील प्रमुख चौका मध्ये व मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त लावला असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके गा्मिण पोलीस स्टेशनचे मिलींदकुमार बहाकर ह्यांनी शहरासह गा्मिण हद्दीत चोख बंदोबस्त कावड उत्सवा दरम्यान लावण्यात आला आहे.
अधिक वाचा : अकोट शहर येथे ईद आणि कावड निमित्ताने शांतता समिती सभा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola