अकोट : अकोट ग्रामिण पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम कालवाडी येथील रहिवाशी अंवधुत काशीराम रावणकर यांनीे अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे ए एस आय गावंडे यांच्या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे.दिलेल्या तक्रार अर्जात नमुद केल्या प्रमाणे की ते वरील पत्यावर राहत असुन शेती करुन उदारनिर्वाह चालवीतात.
दि.२४ आगस्ट रोजी राञी अंदाजे ८ ते ९ वाजता दरम्यान अकोट ग्रामिण पोलीस स्टेशन मधे कार्यरत असलेले ए.एस.आय.गावंडे व अधिक १ पोलीस कर्मचारी नेहमी कामा निंम्मत बाहेर आलो असता माझा घरात गावंडे व एक पोलीस कर्मचारी घरात घुसुन सामान फेकफाक केले व माझा घरातील महिलाना दमदाटी केली त्यावेळी माझी म्हातारी आई ,माझी पत्नी व माझा मोठ्या भावाची मुलंगी घरात हजर होती .माझ्या आईला रक्त दाबाचा ञास असुन गावंडे यांनी माझ्या पत्नीला माझा आई समोरच अपशब्द बोलत असे म्हटले की तुमचा नवरा वरली मटका चालवतो आम्ही त्याला पाहुन घेऊ तुम्ही सुद्धा हराम खोर आहा नवरा चा बचाव करण्यासाठी त्याचे गुन्हे लपवता असे कुर्त्य गावंडे व सोबत आलेला पोलीस यांनी काही कारण नसताना गावातील काही माझा विरोधक मडंळीच्या इशारावर केले आहे.त्यामुळे माझ्या आईची तब्बेंत बिघडली आहे .गुन्हा नसताना माझा घरातील महिलाशी वाईट बोलुन त्याचा अपमान केला आहे तसेच माझा वरली मटक्याशी सबंध नसताना मला बदनाम करण्याकरीता जाणुन बुजुन असे केले आहे तरी ए .एस.आय गावंडे व एक पोलीस याच्यावर कायदेशी कारवाई करावी अशी मागणी अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी याच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.
सदर तक्रारदार विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांचे कायदेशीर काम करू नये म्हणून त्याचा पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.- मिलींद कुमार बहाकर पोलीस निरीक्षक,अकोट ग्रामिण पोलीस स्टेशन जि.अकोला
अधिक वाचा : शिवाजी नगर येथे तंन्टामुक्ती अध्यक्ष पदी श्रीकृष्ण शामराव निमकडेॅ यांची अविरोध निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola