पातूर : बालाजी वेटाळ पातूर येथे राहणारे आनंद उत्तमराव भिंगे यांचे आनंद पान मंदिर अँड कोल्ड्रिंक्स नावाची पाणपट्टी बळापुर रोड पातुरवरील विजय टॉकीज समोर आहे.
आनंदराव यांनी २७ ऑगस्ट ला रात्री १०:३० वाजेपर्यंत धंदा केला व पानपट्टी बंद करून घरी गेले. याच रात्री त्यांचे पानपट्टी वरून टिन काढून व प्लायवूड कापून एका छोट्याश्या छिद्रातून चोर आत गेला व चोरी करून निघून गेला. याबाबत जेव्हा आनंदराव २८ ऑगस्ट ला सकाळी ७:३० वाजता पानपट्टी उघडण्यास गेले व त्यांनी पानपट्टीचे शटर उघडले असता खाली पानपट्टीत सिगारेट चे पॅकेट व बाबा विलायची च्या पुड्या पडलेल्या दिसल्यात व बराच माल अस्ताव्यस्त पडलेला दिसला. तसेच पानपट्टीचे वरचा टिन पत्रा व त्याखालील प्लायवूड कापून छिद्र केलेले दिसले.
पाणपट्टी तील चिललर १ रु. , २ रु, व ५ रुपयाचे नाणे एकूण तीन हजार रुपये नंतर बीस्टरॉल सिगारेट, गोल्डफ्लॅग यांची किंमत एकूण २५ हजार रुपये, सुपारी, सोपं लवंग, विलायची यांची किंमत ४ हजार रुपये असा ३२ हजारांचा माल रात्री कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला.
मागच्या वर्षी सुद्धा याच ऑगस्ट महिन्यात याच पाणपट्टीत जवाडपास २० हजार रुपयांची चोरी झाली होती.
अधिक वाचा : पातुरचे प्रतिष्ठित नागरिक प्रकाश तायडे यांचा लहान मुलगा रवी तायडे यांचा वाशिम जिल्ह्यात अपघाती मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola